घरताज्या घडामोडीCorona Vaccine: अंतिम टप्प्यातील चाचणीत 'स्पुटनिक व्ही' लस ९१.६ टक्के प्रभावी -...

Corona Vaccine: अंतिम टप्प्यातील चाचणीत ‘स्पुटनिक व्ही’ लस ९१.६ टक्के प्रभावी – लेंसेट

Subscribe

रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) लस कोरोना विरोधात ९१.६ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे. लेंसेटमध्ये मंगळवारी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, अनेक तज्ज्ञांनी लस विश्वसनीय असल्याचे म्हटले आहे. दरम्यान रशियाने जगात पहिल्यांदा ११ ऑगस्टला कोरोनाची लस स्पुटनिक व्ही विकसित केल्याची घोषण केली होती. एका उपग्रहाच्या नावावरून रशियाने स्पुटनिक व्ही लसीचे नाव ठेवले आहे. रशियाची ही लस कोरोना विरोधात कायमची प्रतिकारशक्ती विकसित करू शकते, असा दावा केला आहे.

रशियात स्पुटनिक व्ही लसीची अंतिम टप्प्यातील चाचणीचे परिणाम येण्यापूर्वीच मंजूरी दिली होती. यामुळे तज्ज्ञांना टीकेचा सामना करावा लागत आहे. आता २० हजार लोकांवर या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या विश्लेषणानुसार, या लसीचे दोन डोस सिम्पटमॅटिक कोरोना विरोधात ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. लेसेंटच्या म्हणण्यानुसार, स्पुटनिक व्ही लसीच्या प्रक्रियेवर अजाणतेपणाने, घाईने आणि पारदर्शकतेअभावी टीका केली गेली. परंतु आता जे परिणाम समोर आले आहेत, ते स्पष्ट करतात की, कोरोना विरोधातील लढाईसाठी दुसऱ्या लसीचा पर्याय जगासमोर आहे.

- Advertisement -

या परिणामांमुळे फायझर, बायोटेक आणि मॉडर्ना लसीप्रमाणे स्पुटनिक व्ही ९० टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. भारतामध्ये रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे परीक्षण झाले होते. दरम्यान रशियाच्या कोरोना लसीची भारतामध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रेड्डी लॅबोरेटरीमध्ये सुरू आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) आणि रेड्डीज लॅबोरेटरीज( DRL) यामध्ये भागीदारी झाली आहे.


हेही वाचा – Corona Vaccine: रशियात ‘स्पुटनिक व्ही’ लस घेण्यास ५० टक्के डॉक्टरांचा नकार!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -