घरCORONA UPDATEभारतात पुढील आठवड्यापासून Sputnik V चे डोस मिळणार- NITI AAYOG

भारतात पुढील आठवड्यापासून Sputnik V चे डोस मिळणार- NITI AAYOG

Subscribe

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यान केंद्राकडून लसीकरण मोहिमेचा वेग वाढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात विविध देशांतील प्रभावी लसींचा वापरासाठी आणि चाचण्यासाठी केंद्र मान्यता देत आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांना लस दिली गेल्यास संसर्गाचे प्रमाण घटण्यास मदत होऊ शकते. याच कारणामुळे भारतानं गेल्या महिन्यांत रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला भारतात लसीकरणासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन नंतर आता स्पुटनिक-व्ही लसींचे डोस भारतीयांसाठी उपलब्ध झाले आहेत. आज स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात दाखल झाली असून पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रशियातून आता ज्या काही मर्यादित प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध झाले आहे. त्याची विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होईल अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.

- Advertisement -

तसेच पुढील पुरवठा देखील लवकरचं उपलब्ध होईल. जुलै महिन्यात त्याचे उत्पादन सुरु होणार असून या कालावधील १५.६ कोटी डोसचे उत्पादन होईल असा अंदाज असल्याचे डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

स्पुटनिक लस ही ९० टक्के प्रभावी असल्याचं चाचणीतील निष्कर्ष आहेत. रशियन कोरोना लस वापरण्यासाठी आतत्कालीन मंजुरी मिळल्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबने रशियाची स्पुटनिक-व्ही लस आयात केली आहे. यापूर्वी लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल झालेत. तर आज लसींची दुसरी खेप भारतात दाखल झाली. या एका डोसची किंमत भारतात ३०० ते ६०० रुपयांपर्यंत असू शकते असा अंदाज आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -