घरदेश-विदेशS. Jaishankar : मर्यादेत राहा, आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालू नका; परराष्ट्र...

S. Jaishankar : मर्यादेत राहा, आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालू नका; परराष्ट्र मंत्र्यांनी खडसावले

Subscribe

बाहेरील देशांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायच्यापूर्वी विचार करावा. अन्य देशांनी मर्यादेत राहावं, अशा शब्दात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अन्य देशांना खडसावले आहे.

नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे बाहेरील देशांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायच्यापूर्वी विचार करावा. अन्य देशांनी मर्यादेत राहावं, अशा शब्दात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अन्य देशांना खडसावले आहे. केजरीवालांच्या अटकेवरून बाहेरच्या देशातून सरकार विरोधी प्रतिक्रिया येत आहेत. त्यावरून जयशंकर यांनी सुनावले आहे. (S. Jaishankar angry on foreign countries who looking into India internal affairs)

हेही वाचा… S. Jaishankar on Arunachal : तुमच्या घराचे नाव मी बदलले तर ते माझे होईल का; परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला सुनावले

- Advertisement -

भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये लक्ष घातल्यास त्याचे चोख उत्तर मिळेल. त्यामुळे इतर देशांनी आपल्या मर्यादेत राहावे, असे जयशंकर म्हणाले आहेत. कथित दिल्ली मद्य परवाना घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याप्रकरणी अमेरिका, जर्मनी तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने भारतातील घडामोडींवर आमचे लक्ष आहे, असे म्हटले होते. तसेच, भारतात कोणाच्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेतली जावी, अशी सूचना करण्यात आली होती. त्याबाबत जयशंकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका व्यक्तीला केजरीवाल यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्याचे त्यांनी उत्तर दिले. पण, इतर बाबतीत माझे स्पष्ट मत आहे की, हे अत्यंत चुकीचे आहे. असे पायंडे पडू नयेत, ते चूक आहे. प्रत्येक देशाने दुसऱ्या देशाचा आदर करायला हवा, यावर जयशंकर यांनी जोर दिला. नेहमीच एक अंतर ठेवून वागावे, दुसऱ्याच्या राजकीय धोरणांमध्ये कोणीच पडू नये. काही परंपरा, नियम असतात, त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध जपताना त्याचे पालन केले गेलेच पाहिजे. त्यामुळेच भारताबाबत कोणी बोलत असेल, तर त्यांना त्याचे चोख प्रत्युत्तर मिळेल. कोणत्याही देशाला दुसऱ्या देशाच्या राजकीय गोष्टीं बोलण्याचा अधिकार नाही, आम्हीही तो दिलेला नाही, असेही जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात सुनावले.

- Advertisement -

हेही वाचा…. Lok Sabha Election 2024 : …तर भाजपामध्ये जाण्यासाठी मी मोकळा; एकनाथ खडसे स्पष्टच बोलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -