घरताज्या घडामोडीसुदानमधील 'ऑपरेशन कावेरी' हे आव्हानात्मक होतं, एस. जयशंकर यांनी दिली माहिती

सुदानमधील ‘ऑपरेशन कावेरी’ हे आव्हानात्मक होतं, एस. जयशंकर यांनी दिली माहिती

Subscribe

संघर्षग्रस्त सुदानमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकारनं ऑपरेशन कावेरी या मोहिमेला सुरूवात केली होती. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची शेवटची तुकडी ४७ प्रवाशांना घेऊन भारतात आली. त्यामुळे ऑपरेशन कावेरी ही मोहिम फत्ते झाली. यावेळी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी ऑपरेशन कावेरी ही मोहिम आव्हानात्मक होती, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी दिली.

आम्ही सुदानमधून सुमारे ४ हजार भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. ‘ऑपरेशन कावेरी’ हे अत्यंत आव्हानात्मक बचाव कार्य होते. आमच्या दूतावासातील अधिकाऱ्यांनी अदम्य धैर्य आणि समन्वय दाखवला. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून भारतीयांना बाहेर काढले.

- Advertisement -

लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारताने २४ एप्रिलला आपल्या नागरिकांना सुदानमधून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू केले. परदेशात सर्व भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वचनबद्धता हीच आमची प्रेरणा आहे. शुक्रवारी भारतीय हवाई दलाचे C130 विमान आल्याने सुमारे ४ हजार लोकांना ‘ऑपरेशन कावेरी’द्वारे सुदानमधून बाहेर काढण्यात आले, असं एस. जयशंकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : पुलवामात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 5 किलो IEDसह एकाला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -