घरदेश-विदेशइस्त्रोमध्ये हेरगिरीचा आरोप असलेल्या कंत्राटदाराचा मृत्यू

इस्त्रोमध्ये हेरगिरीचा आरोप असलेल्या कंत्राटदाराचा मृत्यू

Subscribe

इस्त्रोमध्ये हेरगिरीचा आरोप असलेल्या एस. के. शर्मा यांचा वयाच्या ६२ व्या वर्षी कर्करोगानं निधन झालं आहे.

इस्त्रोमध्ये हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या कंत्राटदाराचा कर्करोगानं मृत्यू झाला आहे. एस . के. शर्मा असं या कंत्राटदाराचं नाव आहे. एस . के. शर्मा यांच्या पाश्चात तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. १९९४ साली त्यांच्यावर इस्त्रो या अंतराळ संशोधन केंद्रात हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी त्यांचे वय हे ३४ वर्ष होतं. आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणत अत्याचार देखील केले. १९९८ पर्यंत एस. के. शर्मा हे इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. दरम्यान, एस .के. शर्मा यांनी उपचारासाठी ५५ लाखांची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयामध्ये धाव देखील घेतली होती. पण, दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी नंबी नारायण यांच्यावर देखील इस्त्रोमध्ये हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, न्यायालयीन लढाईनंतर ते निर्दोष असल्याचं सिद्ध झालं होतं. त्यांना ५५ लाखांची नुकसान भरपाई देखील देण्यात आली होती. न्यायालयानं त्या प्रकारचे आदेश दिले होते.

वाचा – कॅबिनेटकडून इस्त्रोला १०,९०० कोटींचे आर्थिक पाठबळ

३० वर्ष दिली झुंज

हेगरिगिरीचा आरोप झाल्यानंतर एस. के. शर्मा यांनी जवळपास ३० वर्षे न्यायासाठी झुंज दिली. अखेर वयाच्या ६२व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. शेवटपर्यंत एस. के. शर्मा हे आपण निर्दोष असल्याचं सांगत राहिले. त्यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई देखील दिली. डी. चंद्रशेखर यांच्यावर देखील हेरगिरीचे आरोप आहेत. नंबी नारायणम यांच्याप्रमाणे आपल्याला देखील न्याय मिळेल अशी आशा एस. के. शर्मा यांना शेवटपर्यंत होती. पण अखेर त्यांचा मृत्यू झाला. शर्मा यांचा कर्करोग हा ४थ्या स्टेजला पोहोचला होता. डी. चंद्रशेखर यांच्यासोबत मिळून त्यांनी हेगगिरी केल्याचा आरोप शर्मा यांच्यावर आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. मागील तीन वर्षापासून कॅन्सरशी लढणाऱ्या एस. के. शर्मा यांचा अखेर न्यायाच्या प्रतिक्षेत मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -