घरदेश-विदेशराजस्थान राजकारण : गेहलोत सरकार अल्पमतात; सचिन पायलट यांचा दावा

राजस्थान राजकारण : गेहलोत सरकार अल्पमतात; सचिन पायलट यांचा दावा

Subscribe

राजस्थानमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे अशोक गेललोत यांच्या अडचणी वाढत चालल्या असून त्यातून काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षामधील नाराज उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात तसे स्पष्ट केले आहे. तर जयपूरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अविनाश पांडे यांनी काँग्रेसची सरकार मजबूत असून हे जे कोणी आम्हाला तोडू पाहतयं त्यांच्याशी आम्ही मुकाबला करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, सचिन पायलट यांनी म्हटले आहे की, आपल्याकडे पक्षाच्या ३० पेक्षा जास्त आमदारांचा, काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच सोमवारी सकाळी जयपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. तर काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी काँग्रेसचे सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांच्यासाठी संदेश दिला आहे, असे पांडे यांनी संगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

कल्याण- डोंबिवलीत कोरोनाचे थैमान; सलग ३ ऱ्या दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -