घरताज्या घडामोडीराजस्थानचे CM बदला अन्यथा पंजाबसारखी अवस्था..., सचिन पायलट यांची आक्रमक भूमिका अन्...

राजस्थानचे CM बदला अन्यथा पंजाबसारखी अवस्था…, सचिन पायलट यांची आक्रमक भूमिका अन् नेतृत्वाला इशारा

Subscribe

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना तात्काळ बदला अन्यथा पंजाबसारखी स्थिती होऊन काँग्रेसच्या हातून राज्य जाईल असा इशारा सचिन पायलट यांनी दिला आहे. काँग्रेसमध्ये यापूर्वीसुद्धा सचिन पायलट नाराज होते. यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पदावरुनसुद्धा हटवण्यात आले होते. तसेच त्यांना नंतर पक्ष प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. राजस्थान काँग्रेसमुळे नेतृत्वासमोर पेच निर्माण झाला आहे.

राजस्थानचे काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस नेतृत्वाला विचार करण्यास भाग पडले आहे. राजस्थानच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत सचिन पायलट यांची बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी आपल्याला राजस्थानचे मुख्यमंत्री करण्यात यावे अशी मगाणी सचिन पायलट यांनी केली आहे.

- Advertisement -

पक्षाने उशीर केला तर पंजाबसारखी अवस्था…

राजस्थानमध्ये आगामी वर्ष २०२३ मध्ये निवडणुका होणरा आहेत. या निवडणुकांमध्ये जर पक्षाला चांगली कामगिरी करायची असेल तर विद्यमान मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि आपल्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात यावे अशी मागणी सचिन पायलट यांनी केली आहे. लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा. उशी झाला तर काँग्रेसची पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्ये परिस्थिती होईल. राजस्थान काँग्रेसच्या हातून जाईल असे सचिन पायलट यांनी सांगितले आहे. सचिन पायलट यांनी दिल्लीत पक्ष नेतृत्वाशी तीनवेळा बैठक केली आहे. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते.

राजीनामा १९९८ पासून सोनिया गांधींकडे – गहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, १९९८ पासून आपला राजीनामा कायमस्वरूपी सोनिया गांधींकडे ठेवण्यात आला आहे. जेव्हा मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरु असेल तेव्हा कोणाला खबर मिळणार नाही. रातोरात हे सगळं होऊन जाईल. यावर कोणतीही चर्चा किंवा चिंतन होणार नाही. काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. यामुळे अपवांवर विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री गहलोत म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : काँग्रेसची ऑफर नाकारल्यानंतर प्रशांत किशोर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, राहुल गांधींची प्रतिमा…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -