घरताज्या घडामोडीमी दिल्लीला जाणार नाही.., राजस्थानमधील सत्तासंघर्षावर सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

मी दिल्लीला जाणार नाही.., राजस्थानमधील सत्तासंघर्षावर सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

Subscribe

राज्यस्थानमधील सत्तासंघर्षावर पेच निर्माण झाला असून अशोक गेहलोत विरूद्ध सचिन पायलट असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात राजकीय संकट निर्माण झालं आहे. सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांचा विरोध आहे. या सत्तासंघर्षावर सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी जयपूरमध्ये असून सध्या तरी दिल्लीला जाणार नाही. हायकमांडला त्यांचा निर्णय घेऊ दे, त्यानंतर मी माझा निर्णय घेईन, असं स्पष्टीकरण सचिन पायलट यांनी दिलं आहे.

- Advertisement -

अजय माकन यांची संतप्त प्रतिक्रिया…

काँग्रेसचे निरीक्षक अजय माकन हे आमदारांशी चर्चा करण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, प्राथमिकदृष्ट्या ही अनुशासनहीनता सुरु आहे. आम्ही बैठक बोलावलेली असताना त्याच वेळी आणखी एक बैठक बोलावण्यात आली. ते सर्व आमदार आहेत. कोणी राजीनामा दिला आहे हे त्यांनाच माहिती नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष यावर निर्णय घेतील, असं अजय माकन म्हणाले.

- Advertisement -

राजस्थानमध्ये काँग्रेसचे 108 आमदार आहेत. यातील बहुतांश आमदार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे समर्थन करणारे असल्याचे रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिसून आले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकी आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशींच्या निवासस्थानी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. याबाबत राजस्थानचे मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी माहिती पत्रकारांना दिली.

एक व्यक्ती, एक पद यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची असल्यास अशोक गेहलोत यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडले पाहिजे असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. परंतु हे अशोक गेहलोत आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मान्य नसल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा : राजस्थान काँग्रेसमध्ये भूकंप; पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदाला गेहलोत समर्थक आमदारांचा विरोध


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -