Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'या' कंपनीत केली २० लाख डॉलर्सची मोठी गुंतवणूक!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘या’ कंपनीत केली २० लाख डॉलर्सची मोठी गुंतवणूक!

Related Story

- Advertisement -

मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर उद्योग व्यवसायात नवी इनिंग सुरू करत आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने डिजिटल एंटरटेनमेंट आणि टेक्नलॉजीच्या क्षेत्रातील जेटसिंथेसिस (JetSynthesys) या कंपनीमध्ये जवळपास १५ कोटी रुपयांची म्हणजेच २० लाख डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. जेटसिंथेसिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला आणि क्रिस गोपालकृष्णन यांचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे. डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान कंपनी जेटसिंथेसिसने गुरुवारी ही माहिती दिली असून कंपनीने सांगितले की, गुंतवणुकीमुळे कंपनीचे तेंडुलकरसोबतचे नाते आणखी दृढ झाले आहे. जेटसिंथेसिस ही कंपनी पुण्यात आहे. भारताव्यतिरिक्त जपान, यूके, युरोपियन संघ, यूएसए येथे कार्यालये आहेत.

गेमिंगमध्ये दोन नवीन प्लॅटफॉर्म लाँच करण्यासाठी जेटसिंथेसिसने सचिनसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स, सचिन सागा व्हीआर आणि १०० एमबी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स या गेमची युजर्स संख्या दुप्पट झाली आहे. आजच्या घडीला या गेमचे २० लाख फॉलोअर्स झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

जेटसिंथेसिसबरोबर पाच वर्ष जुने संबंध असल्याचे सचिन तेंडुलकरने सांगितले असून सचिन सागा क्रिकेटमध्ये व्हर्च्युअल रिएलिटीमधून युजर्सला क्रिकेटचा अनुभव दिला. आजच्या घडीला या श्रेणीतील सर्वात लोकप्रिय गेम असून दोन कोटींहून अधिक डाउनलोड्स झाले असल्याचे त्याने यावेळी सांगितले. जेटसिंथेसिसचे व्हाईस चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक राजन नवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्सचा डेली यूजर बेस १२ महिन्यात दुप्पट झाला आहे. सध्या या गेमचे २० लाख फॉलोअर्स आहेत. आयपीएल आणि वर्ल्ड कपमुळे आगामी दिवसात १००एमबीच्या युर्जमध्येदेखील वाढ होण्याची अपेक्षा आहे.


India Corona Update: गेल्या २४ तासांत बाधितांमध्ये घट तर मृतांमध्ये वाढ; ४१,६४९ नवे रूग्ण, ५९३ मृत्यू

- Advertisement -