‘येथे कमवतात आणि पाकिस्तानला पाठवतात’ -साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा शाहरुखवर निशाणा

वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सध्या सुरु असलेल्या आर्यन खान ड्र्ग्ज प्रकरणावरून थेट अभिनेता शाहरुख खानवर निशाणा साधला आहे. तो इथे कमावतो आणि पाकिस्तानात खर्च करतो. हळूहळू सगळं बाहेर येईल असे म्हणत देशात फक्त देशभक्तच राहतील असेही साध्वी यांनी म्हटले आहे.

तसेच शाहरुखने जेव्हा मदत केली ती पाकिस्तानची मदत केली आहे. भारताला त्याने कधीही मदत केलेली नाही. ते येथे कमवतात आणि पाकिस्तानात पाठवतात. आता त्यांचे वास्तव समोर येत आहे. असेही साध्वी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर बॉलीवूडचे जग ग्लॅमरस असून  हे लोकं जमिनीवरील जीवन स्विकारत नाहीत. यामुळेच त्यांना अशा प्रकारच्या गोष्टींची गरज असते. त्यांनी बॉलीवूडमध्ये भरपूर पैसा कमावला पण चांगल्या कामात गुंतवला नाही. यामुळे त्यांची मुलं असे उद्योग करत आहेत.असा टोला मारत साध्वी यांनी शाहरुख आणि तमाम बॉलीवूडकरांना लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह सातजणांना १४ दिवसांची न्याायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच उद्या आर्यनसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी होणार आहे.