घरदेश-विदेश'पक्षशिस्तीला अनुसरूनच कारभार करेन' - साध्वी प्रज्ञा

‘पक्षशिस्तीला अनुसरूनच कारभार करेन’ – साध्वी प्रज्ञा

Subscribe

मी पक्षाची शिस्तबध्द सदस्य आहे. पक्ष संघटनेत शिस्त असली पाहिजे, मला संधी मिळेल तेव्हा मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला आवडेल.

भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती. त्यावेळी त्यांना भाजपाकडून कारणेदाखवा नोटीसही बजावली होती. यापुढे पक्षशिस्तीला अनुसरूनच आपला कारभार असेल असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे.

मी पक्षाची शिस्तबध्द सदस्य आहे. पक्ष संघटनेत शिस्त असली पाहिजे, मला संधी मिळेल तेव्हा मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला आवडेल. अशी इच्छा साध्वी प्रज्ञा यांनी व्यक्त केली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात विजय मिळवला आहे.

- Advertisement -

साध्वींची वादग्रस्त वक्तव्य

भोपाळमधून साध्वी प्रज्ञा यांनी उमेदवारी जाहीर झाली. प्रचारादरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी अनेक बेतालवक्तव्य केली. सर्वात आधी दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य त्यांनी केलं. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा आपल्या शापामुळेच मृत्यू झाला असा दावा साध्वी प्रज्ञा यांनी केला होता. या विधनावर चहूबाजूंनी टीका झाल्यावर त्यांनी माफी मागितली. या विधानानंतर नथुराम गोडसे यांची स्तुती केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी साध्वी प्रज्ञा यांची कानउघडणी केली. गोंडसेंबद्दल साध्वी प्रज्ञा जे म्हणाल्या त्याबद्दल कधीही माफ करणार नाही असे मोदीही सभेत म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -