घरदेश-विदेशसाध्वी प्रज्ञा सिंह यांचा मद्याबाबत विचित्र दावा; म्हणाल्या, दारू कमी प्रमाणात पिणे...

साध्वी प्रज्ञा सिंह यांचा मद्याबाबत विचित्र दावा; म्हणाल्या, दारू कमी प्रमाणात पिणे हे औषधासारखेच

Subscribe

गुरुवारी साध्वी प्रज्ञा यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले होते की, "दारू स्वस्त असो वा महाग, दारू औषध म्हणून काम करते. आयुर्वेदात मर्यादित प्रमाणात अल्कोहोल हे औषधासारखेच काम करते. तर अमर्याद प्रमाणात मद्यपान हे विषासारखे आहे ते प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, ऐकले पाहिजे आणि अधिक घेतल्याने होणारे नुकसान समजून घेऊन ते थांबवले पाहिजे.

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात दारूचे भाव कमी झाल्यानंतर भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर एका विचित्र विधानामुळे चर्चेत आल्यात. खरं तर प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, आयुर्वेदात मर्यादित प्रमाणात अल्कोहोल घेणे हे औषधासारखे आहे, तर अमर्याद प्रमाणात मद्यपान हे विषासारखे आहे. त्याचवेळी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

साध्वी प्रज्ञा यांनी दारूला सांगितले औषध

गुरुवारी साध्वी प्रज्ञा यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले होते की, “दारू स्वस्त असो वा महाग, दारू औषध म्हणून काम करते. आयुर्वेदात मर्यादित प्रमाणात अल्कोहोल हे औषधासारखेच काम करते. तर अमर्याद प्रमाणात मद्यपान हे विषासारखे आहे ते प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, ऐकले पाहिजे आणि अधिक घेतल्याने होणारे नुकसान समजून घेऊन ते थांबवले पाहिजे.

- Advertisement -

शिवराज सिंह सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत दारू स्वस्त केली

शिवराज सिंह चौहान यांनी नवीन उत्पादन शुल्क धोरणात दारू स्वस्त केली आणि दारूची दुकाने न वाढवण्याचे आश्वासन देऊनही एका दुकानात दोन दुकानांना परवानगी दिली. सरकारच्या नवीन दारू धोरणानुसार राज्यात देशी-विदेशी दारू एमआरपीपेक्षा 20 टक्के कमी दराने उपलब्ध होणार आहे. मात्र, नवीन दारूची दुकाने सुरू होणार नाहीत. मात्र देशी-विदेशी दारू एकाच दुकानात मिळणार आहे. 1 एप्रिलपासून सुपरमार्केटमध्येही वाईनची विक्री केली जाणार आहे. काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी या मुद्द्यावरून भाजप सरकारला घेरले आहे.

उमा भारती काय करत आहेत?

नव्या अबकारी धोरणावरून राज्यात राजकारण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय सिंह यांनी अबकारी धोरणाच्या निमित्ताने उमा भारतींवर निशाणा साधलाय. अजय सिंह म्हणाले, “उमा भारती काय करत आहेत. उमा भारती म्हणाल्या की, मी अंमली पदार्थ बंदीसाठी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, पण आता त्या कुठे आहेत? ते म्हणाले की, सरकार दारूबंदीसाठी कोणतेही गंभीर प्रयत्न करत नाही.

- Advertisement -

हेही वाचा : गेल्या वर्षी 2 हजार 489 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -