घरदेश-विदेशSAI RECRUITMENT 2021 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात ३२० जागांसाठी भरती

SAI RECRUITMENT 2021 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात ३२० जागांसाठी भरती

Subscribe

भारतीय क्रीडा प्राधिकरणात (Sports Authority of India, SAI) कोचत आणि असिस्टंट कोच या दोन पदासाठीच्या ३२० जागांसाठी भरती प्रक्रिया राबली जात आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भातील अधिक माहिती देण्यात आली आहे. या पदांसाठी २० एप्रिल २०२१ अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २० मे २०२१ पर्यंत उमेदवार शेवटचा अर्ज भरू शकणार आहेत शकतात. त्यामुळे २० मे २०२१ सायंकाळी ५.३० पर्यंत उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.

या भरतीच्या प्रक्रियेच्या माध्यामातून कोच पदासाठीची १०० रिक्त पदे आणि असिस्टंट कोच पदाची २२० रिक्त पदे भरली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचे असल्यास sportsauthorityofindia.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सविस्तर माहिती पाहू शकतात. या वेबसाईटवर कोच आणि असिस्टंट कोच या पदांच्या भरतीप्रक्रियेसंदर्भत दोन वेगवेगळ्या पीडीएफ फाईल देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

कोच पदासाठी शैक्षणिक पात्रता-

कोच पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे SAI, NS NIS किंवा अन्य मान्यता प्राप्त भारतीय/विदेशी विद्यापीठांमधून कोचिंगचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे, किंवा ऑलिम्पिक/वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल विनर असणे आवश्यक आहे. तसेच दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवलेला असणं आवश्यक आहे, किंवा ऑलम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला असणे आवश्यक आहे.

असिस्टंट कोच पदासाठी शैक्षणिक पात्रता-

असिस्टंट कोच पदासाठी इच्छुक उमेदवारांनी SAI, NS NIS किंवा अन्य मान्यता प्राप्त भारतीय/विदेशी विद्यापीठांमधून कोचिंगचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे, किंवा ऑलम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कोच साठी उमेदवारांचे कमाल वय ४५ वर्ष आणि असिस्टंट कोच पदासाठी कमाल वय ४० वर्षे असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

कसा कराल अर्ज

१) इच्छिक उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास खालील वेबसाईटवर जावे.

sportsauthorityofindia.nic.in

२) त्यानंतर Job Opportunities लिंक पर क्लिक करा.

३) एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरील APPLY FOR JOB बॉक्सवर क्लिक करा.

४) त्यानंतर संबंधित कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहेत ते सिलेक्ट करत तुम्ही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करु शकता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -