इटावा : उत्तर प्रदेशातील इटावामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सैफई मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने परदेशात जाण्याच्या लालसेपोटी गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळला आहे. या डॉक्टर समीर सराफ यांने जवळपास 600 रुग्णांना खोटे पेसमेकर लावले. यामुळे आतापर्यंत 200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या पोलिसांनी डॉक्टर समीर सराफ यांना खोटे पेसमेकर लावल्याप्रकरणी अटक केले आहे.
सैफई मेडिकल कॉलेजच्या कार्डिओलॉजी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. समीर सराफ यांनी एसजीपीजीआयने निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने रुग्णांना खोटे पेसमेकर बसवले होते. रुग्णाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर सैफई मेडिकल कॉलेज प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली होती. यानंतर चौकशीत रुग्णांनी केलेली तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले असून निश्चित केलेल्या किमतीपेक्षा 9 पट अधिक किमत आकारण्यात आल्याचे चौकशी समितीच्या तपासातून उघड झाले असून ते खोटे पेसमेकरचीही पुष्टी झाली. यानंतर तज्ज्ञांचे राज्यस्तरीय तपास पथक तयार करण्यात आले. तसेच सैफई वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन कुलसचिव सुरेश चंद शर्मा यांनी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक प्राध्यापक डॉ.आदेश कुमार यांना पत्र लिहिले होते. ज्यात ही बाब रुग्णालयाशी संबंधित असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा – ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरण: पंचतारांकित सोईसुविधांसाठी ‘तो’ देत होता ‘एवढे’ पैसे?
लाखो रुपयांची हेराफेरी
या प्रकरणाचा तपास पीजीआय पोलीस चौकीचे तत्कालीन प्रभारी उपनिरीक्षक केके यादव यांनी केला आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता. सैफई मेडिकल कॉलेजच्या कॅथ लॅबसाठी एक ते दीड वर्षाची उपकरणे उपलब्ध असूनही डॉ. समीरने 2019 मध्ये जवळपास 1 कोटी रुपयांची अनावश्यक उपकरणे खरेदी केल्यांचा आरोप करण्यात आला. यामध्ये डॉ. समीरने 2019 मध्ये सुमारे 1 कोटी रुपयांची अनावश्यक उपकरणे खरेदी केल्याचा त्यांच्यावर करण्यात आला. यात डॉ. समीरने लाखो रुपयांची हेराफेरी केली असून मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने अनेक पातळ्यांवर चौकशी केल्यानंतर पेमेंट थांबवले होते, यासंदर्भात 24 डिसेंबर 2022 रोजी स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आली होती.
हेही वाचा – ‘त्याला’ नग्न करून नाचायला लावले अन् व्हिडीओही बनवला; पैशांसाठी मित्रच बनले शत्रू
सरकार पीडितांसोबत – उपमुख्यमंत्री
मध्य प्रदेशातून परतलेले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य गुरुवारी सैफई हवाई पट्टीवर काही काळ थांबले होते. तेव्हा मुख्यमत्र्यांना डॉ. समीरच्या बाबतीत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, ज्या लोकांना या समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्या सर्वांना सरकार शोधून काढेल आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. कुलसचिव डॉ. चंद्रवीर सिंग म्हणाले, डॉक्टर समीर तुरुंगात असून या प्रकरणासंबंधितचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल.