घरदेश-विदेशअखेर मुलींसाठी सैनिक स्कूलची दारं उघडली

अखेर मुलींसाठी सैनिक स्कूलची दारं उघडली

Subscribe

त्याबाबतची परवानगी मंत्रालयाने दिली आहे. त्यानुसार देशातील ५ सैनिक स्कूलमध्ये मुलींना देखील प्रवेश घेता येणार आहे.

देशाची सेवा करण्याची इच्छा, स्वप्न असणाऱ्या देशातील कन्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुलांप्रमाणे आता मुलींनासुद्धा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश देण्याबाबतचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्याबाबतची परवानगी मंत्रालयाने दिली आहे. त्यानुसार देशातील ५ सैनिक स्कूलमध्ये मुलींना देखील प्रवेश घेता येणार आहे.

५ जानेवारी रोजी प्रवेश परिक्षा

देशभरात चंद्रपूर (महाराष्ट्र), विजापूर (कर्नाटक), कोडागु (कर्नाटक), घोराला (उत्तराखंड), कालिकिरी (आंध्रप्रदेश) या राज्यात ५ सैनिक स्कूल आहे. या शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. ६ डिसेंबर २०१९ रोजी ही अंतिम तारीख आहे. याची प्रवेश परिक्षा ५ जानेवारी २०२० रोजी होणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेकरता https://www.sainikschooladmission.in/index.html या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. सहाव्या इयत्तेपासून मुलींना या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेता येणार आहे. सैनिक स्कूलमधील प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थिनींकरीता १५ परिक्षा केंद्रांसोबत दोन अतिरिक्त परिक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थिनींच्या राहण्याच्या सोयीकरता ७४ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

- Advertisement -

सैनिक स्कूल प्रवेशासाठी खालील अटी

विद्यार्थिनी AISSEE2020 च्या माध्यमातून ‘sainikschooladmission.in’या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी १० ते १२ वर्षे वयोमर्यादा आहे तर नववीच्या वर्गात प्रवेश घेण्यातकरता १३ ते १५ वर्षे अशी वयोमर्यादा आहे. ४०० रुपये प्रवेश शुल्क असून यामध्ये सर्वसाधारण विभागातील विद्यार्थी प्रवेश नोंदणी करू शकतात. तर राखीव वर्गातील विद्यार्थिनींकरता प्रवेश शुल्क २५० रुपये असणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेकरता प्रवेश परिक्षा घेण्यात येणार असून सहाव्या वर्गाकरता ३०० गुणांची तर नववीच्या वर्गासाठी प्रवेश परिक्षा ४०० गुणांची असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -