Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशSajjan Kumar : संजय गांधींचे निकटवर्ती ते खासदार, असा होता सज्जन कुमारांचा राजकीय प्रवास

Sajjan Kumar : संजय गांधींचे निकटवर्ती ते खासदार, असा होता सज्जन कुमारांचा राजकीय प्रवास

Subscribe

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 साली दिल्लीत उसळलेल्या शीख दंगल प्रकरणात काँग्रेस नेते, माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने सज्जन कुमार यांना 12 फेब्रुवारीला दोषी ठरवले होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 साली दिल्लीत उसळलेल्या शीख दंगल प्रकरणात काँग्रेस नेते, माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने सज्जन कुमार यांना 12 फेब्रुवारीला दोषी ठरवले होते. त्यानंतर 21 फेब्रुवारीपर्यंत निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणात पीडित अर्जदारांनी सज्जन यांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. 12 फेब्रुवारीला दोषी ठरविल्यानंतर कोर्टाने तिहार सेंट्रल जेलच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मानसिकस्थितीचा अहवाल मागितला होता. मृत्यू दंडाच्या प्रकरणात असा अहवाल मागितला जातो. पण हे सज्जन कुमार आहेत कोण? त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता, हे जाणून घेऊया… (Sajjan Kumar political journey was from a close associate of Sanjay Gandhi to an MP)

सज्जन कुमार यांचा जन्म 23 सप्टेंबर 1945 ला झाला. म्हणजेच, त्यांचा जन्म हा ब्रिटीश काळात झाला. त्यांच्या राजकीय प्रवासाला 1977 मध्ये सुरुवात झाली. ते सर्वप्रथम 1977 मध्येच दिल्लीच्या नगरसेवक पदी निवडून आले. त्यानंतर 1980 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली आणि तिथेही त्यांचा विजय झाला. यानंतर ते गांधी कुटुंबाच्या विशेषतः संजय गांधी यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. कट्टर काँग्रेसी असलेले सज्जन कुमार हे काँग्रेसच्या प्रत्येक आंदोलनात पुढे असायचे. त्याचमुळे 1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या दंगलीमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी राहिले. ज्यामध्ये आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

हेही वाचा… Sajjan Kumar : सज्जन कुमार यांना जन्मठेप होण्याचे कारण काय? जाणून घ्या सविस्तर

1984 च्या शीख दंगलीनंतर सज्जन कुमार यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाही. त्यांच्याविरोधात अनेक पुरावे होते, मात्र तरीही त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आला नाही. पण 2002 मध्ये, दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने त्यांना शीख दंगलींशी संबंधित एका प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. महत्त्वाची बाब म्हणजे शीख दंगलीनंतरही सज्जन कुमार यांनी निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकल्या. 1991 आणि 2004 मध्ये सज्जन कुमार यांनी निवडणूक लढवली होती, या दोन्ही निवडणुकीत विजयी होऊन सज्जन कुमार हे लोकसभेत पोहोचले होते.