Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशSajjan Kumar : काँग्रेस माजी खासदार सज्जन कुमारांना जन्मठेपेची शिक्षा, नेमके प्रकरण काय?

Sajjan Kumar : काँग्रेस माजी खासदार सज्जन कुमारांना जन्मठेपेची शिक्षा, नेमके प्रकरण काय?

Subscribe

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत मोठी दंगल उसळली होती. या दंगलीत जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरूणदीप सिंग यांना जिवंत जाळण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे नाव समोर आले होते. याच प्रकरणी आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मोठी दंगल उसळली होती. त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिल्लीत प्रचंड जाळपोळ, लुटालूट झाली होती. 1984 मध्ये झालेल्या या प्रकरणात काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे नाव समोर आले होते. त्याचप्रकरणी तब्बल 41 वर्षांनंतर म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये निकाल लागला आहे. सरस्वती विहार प्रकरण म्हणून गाजलेल्या या हिंसाचार प्रकरणात सज्जन कुमार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, या प्रकरणातील प्रमुख आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सज्जन कुमार यांना दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राऊज अॅव्हेन्यु कोर्टाकडून सज्जन कुमार यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधी डिसेंबर 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (Sajjan Kumar the Former MP of Congress sentenced to life imprisonment)

नेमके प्रकरण काय?

1 नोव्हेंबर 1984 साली दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरूणदीप सिंग यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सज्जन कुमार हे एका जमावाचे नेतृत्व करत होते. सज्जन कुमार यांनी भडकावल्यामुळे जमावाने जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरूणदीप सिंग यांना जिवंत जाळले. यानंतर जमावाने जसवंत सिंग यांच्या घरात लुटलूट केली आणि कुटुंबीयांना जखमी केले. याप्रकरणी पंजाबी बाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. परंतु, नंतर विशेष तपास पथकाने हे प्रकरण आपल्या हाती घेतले. 16 डिसेंबर 2021 मध्ये न्यायालयाने सज्जन कुमार यांच्याविरोधात आरोप निश्चिती केली होती. या प्रकरणात सज्जन कुमार हे 2018 पासून तुरुंगात होते. 12 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला व सज्जन कुमार यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार आरोप निश्चित केले होते.

हेही वाचा… Justice delayed : खूनप्रकरणातून आरोपीची तब्बल 21 वर्षांनी निर्दोष मुक्तता, काय म्हणाले सुप्रीम कोर्ट

महत्त्वाची बाब म्हणजे, याआधी डिसेंबर 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांना हिंसाचार आणि दंगल भडकावल्याबद्दल दोषी ठरवले होते. सज्जन कुमार हे तिहार तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. तर, यापूर्वी 8 जानेवारी 2025 रोजी झालेल्या सुनावणीत राऊज अव्हेन्यु न्यायालयाने सज्जन कुमार यांच्याबाबतीतील निकाल पुढे ढकलला होता. त्यानंतर 31 जानेवारीला सुद्धा कुमार यांचा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. दोन्ही वेळा, तिहार तुरूंगात बंद असलेले सज्जन कुमार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विशेष न्यायाधीश कावेरी बवेजा यांच्या न्यायालयात हजर झाले होते.