Salmonella: अमेरिकेत कांद्यातून साल्मोनेला विषाणूचा संसर्ग, CDC ने दिला सतर्कतेचा इशारा

साल्मोनेला विषाणूच्या संसर्गामुळे अमेरिकेत आतापर्यंत ६५२ नागरिकांना संसर्ग

Salmonella outbreak Onion cause Bacterial Infection in US , 652 infected
Salmonella: अमेरिकेत कांद्यातून साल्मोनेला विषाणूचा संसर्ग, CDC ने दिला सतर्कतेचा इशारा

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या देशातही कोरोना विषाणूने होत्याचे नव्हते केले. कोरोना नंतर आता अमेरिकेत एका नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सहसा कांद्यामुळे आपल्यावर रडण्याची वेळ येते मात्र अमेरिकेत कांद्यामुळे साल्मोनेला विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.कोरोना प्रमाणेच हा संसर्ग वेगाने संक्रमित होत आहे. अमेरिकेतील ३७ राज्यांमध्ये या विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने अमेरिकेतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच CDC सतर्कतेचा इशारा देत असताना म्हटले आहे की, हा संसर्ग जरी कांद्यातून पसरत असाल तर त्याचे विषाणू दुधातूनही पसरू शकतात त्यामुळे दूध पिताना शक्यतो ते उकळून पिण्याचा सल्ला CDC ने दिला आहे. तसेच कच्चे दूध जेवणाच्या कोणत्याही पदार्थात वापरू नये असेही सांगण्यात आले आहे.

साल्मोनेला विषाणूच्या संसर्गामुळे अमेरिकेत आतापर्यंत ६५२ नागरिकांना संसर्ग झाला असून त्यातील १२९ नागरिक सध्या रुग्णालयात उपचार घेतल आहे. CDC ने दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही ३१ मे ते ३० सप्टेंबर पर्यंतची आहे. या संख्येत वाढ देखील झालेली असू शकते. असे असेल तरी या विषाणूच्या संसर्गामुळे अद्याप कोणाचीही मृत्यू झालेला नाही.

कुठून आला हा विषाणू?

CDC ने दिलेल्या माहितीनुसार, या विषाणीचा उगम हा मेक्सिकोमधील चिहुआहुआ येथून झाला आहे. तिथे आयात झालेल्या कांद्यांमधून हा संसर्ग पसरल्याचे समोर आले आहे. येथे खरेदी केलेल्या ७५ टक्के लोकांनी कांदा खाल्ला आहे. तर काहींनी यातील कच्चा कांदा देखील खाल्ला आहे. इथला कांदा अनेक रेस्टॉरंटमध्ये देखील विकला गेला होता त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये जाऊन कांदा खाल्लेल्यांचा याच सर्वाधिक समावेश असल्याचे CDC ने म्हटले आहे.

साल्मोनेलाची लक्षणे काय?

साल्मोनेलाची लागण झाल्यास पहिल्यांदा हगवण,ताप,डोकेदुखू आणि पोट दुखणे यासारखी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ खाताना सावधानता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

CDCने दिला सतर्कतेचा इशारा

या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत एकाची रुग्णाचा मृत्यू झाला नसला तरी याचा संसर्ग वाढू नये यासाठी CDC ने अमेरिकेतील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. पिवळे, सफेद आणि लेबल नसलेले कांदे शक्यतो खरेदी करू नये.अशाप्रकारचे कोणतेही कांदे आढळ्यास ते फेकून द्या, असे सांगण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे चिहुआहुआ मधून आयात करण्यात आलेले कांदे खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – Coronavirus vaccine : ‘जॅब फॉर जॉब’, कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी अशी एम्प्लॉयर्सची इच्छा