घरताज्या घडामोडी'जशी शेतकऱ्यांची माफी मागितली, तशी खासदारांचीही माफी मागावी लागणार'; जया बच्चन यांचा...

‘जशी शेतकऱ्यांची माफी मागितली, तशी खासदारांचीही माफी मागावी लागणार’; जया बच्चन यांचा भाजपवर हल्ला

Subscribe

समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी पुन्हा एकदा केंद्रात सत्ता असलेल्या भाजप सरकारवर हल्ला केला आहे. जया बच्चन म्हणाल्या की, ‘जशी या लोकांनी शेतकऱ्यांची माफी मागितली, तशीच खासदारांची माफी मागतील. तसेच ज्याप्रकारे सध्या सरकार काम करत आहे, ते अत्यंत निषेधार्ह आहे.’

हिंदी वृत्तवाहिनी एनडीटीव्हीशी बातचित करताना जया बच्चन म्हणाल्या की, ‘आमचे खासदार बसले आहेत. त्यांचे निलंबन परत घेतले जात नाही. हा न्याय नाही, परंतु या सरकारकडून अपेक्षा करणे चुकीच आहे. या लोकांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. आता निलंबित खासदारांकडूनही अशीच माफी मागतील.’

- Advertisement -

काल, राज्यसभेत जया बच्चन यांनी तुमचे लवकरच वाईट दिवस सुरू होणार असा भाजपला शाप दिला. त्याबाबत जया बच्चन म्हणाल्या की, ‘नाराज होती. यामुळे मी शाप दिला. या सरकारचे लवकरच वाईट दिवस येणार आहेत.’

दरम्यान पुढे जया बच्चन म्हणाल्या की, ‘सरकारच्या चुकीच्या कामाबाबत माध्यमांनी बोलले पाहिजे. हे लोकं माध्यमांना धक्का देत आहेत. सर्वांची जबाबदारी आहे. निष्पक्ष होऊन आवाज उठवा. हे लोकं उलट्या गंगेत अंघोळ करून आले आहेत. तिथे यांचे सर्व पाप धुवून गेले आहेत. गंगा घाणेरडे झाली आहे, त्यांनी जी काही पापे धुतली, ती गंगेत आहेत.

- Advertisement -

काल जया बच्चन यांनी काय म्हणाल्या?

राज्यसभेत केंद्र सरकारने आणलेल्या अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ विधेयक २०२१वर सोमवारी राज्यसभेत चर्चा झाली. यावर जया बच्चन म्हणाल्या की, ‘मला बोलण्याची संधी दिली. आम्ही मोठ्या मुद्द्यांवर चर्चा करत नसून बीलच्या क्लॅरिकल एररवर चर्चा करत आहोत. नेमके काय चालले?, बघा तुमचा स्वभाव आणि वृत्ती अशीच राहिली तर, तुमचे वाईट दिवस लवकरच येतील.’


हेही वाचा – मतदान ओळखपत्र आता आधार कार्डशी लिंक होणार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -