संभाजी राजे ‘या दिवशी’ जाहीर करणार आपली राजकीय भूमीका

पुढे काय करणार हे लवकरच जाहीर करणार आहे. पुढे काय करायचे हे माझ्या डोक्यात ठरलेले आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Sambhaji Raje will announce his political role by holding a press conference in Pune
Sambhaji Raje will announce his political role by holding a press conference in Pune

संभाजी राजे छत्रपती यांच्या खासदारकीची मुदत आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर ते आज नवीन राजकीय वाटचालीची घोषणा करणार होते. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शतब्दीचा कार्यक्रम 6 मे राजी असल्याने त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मी राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे काय करणार हे लवकरच जाहीर करणार आहेत. 6 मे रोजी शाहू स्मृती शताब्दीचा कार्यक्रम आहे. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केले. पुढे काय करायचे हे माझ्या डोक्यात ठरलेले आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढे काय करायचे हे माझ्या डोक्यात ठरलेले आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिल्ली आणि मुंबई दोन्ही राजकारणात उतरायला मला आवडेल. राजकारणात उतरायचे हे आता निश्चित आहे. मग दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्ही राजकारणात मी रमतो. दोन्हीकडे माझे संपर्क वाढलेला आहे. महाराष्ट्र माझ्याकडे बघतो की शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला पाहिजे. तर दिल्लीतल्या लोकांची इच्छा आहे शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज इथे आला आहे, इथे त्याची ताकद वाढायला हवी आहे. दोन्ही अँगल आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय होणार आहे, असे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.