घरदेश-विदेशपक्षाचे नेते असल्याने संजय राऊतांवरील कारवाई स्थगित करायची का? संबित पात्रांचा रोकडा...

पक्षाचे नेते असल्याने संजय राऊतांवरील कारवाई स्थगित करायची का? संबित पात्रांचा रोकडा सवाल

Subscribe

संजय राऊत एका पक्षाचे नेते आहेत म्हणून ईडीने तपास थांबवून प्रकरण बंद करणं गरजेचं आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊत यांच्या अटकेवरून संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे.

पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (Enforcement Directorate) कारवाई केली आहे. यावरून देशभरात वादंग उठला आहे. तसेच, लोकसभा आणि राज्यसभेतही यावरून काल गोंधळ झाला. त्यामुळे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (BJP Spokesperson) यांनी यावरून संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. संजय राऊत एका पक्षाचे नेते आहेत म्हणून ईडीने तपास थांबवून प्रकरण बंद करणं गरजेचं आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊत यांच्या अटकेवरून संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे.

हेही वाचा – भाजपात गेलेल्यांवर कारवाई चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा; संभाजीनगरमध्ये बॅनरची चर्चा

- Advertisement -

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांचा सहभाग आहे. पण तरीही विरोधक भ्रष्टाचाराचं राजकारण करत आहे. विरोधक भ्रष्टाचारावर विनाकाण गोंधळ घालत आहेत. यामुळे संसदेतील वातावरण बिघडवून कामकाज चालू देत नाहीत, असंही संबित पात्रा म्हणाले.

संजय राऊत यांची न्यायालयाने कोठडीत रवानगी केली असून त्यांच्याविरोधात कागदपत्रे आहेत. हे राजकीय पक्षातले आहेत की कुठल्यातरी मोठ्या घराण्यातील आहेत म्हणून त्यांना वाचवायचे प्रयत्न सुरू आहे का? राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणावर माझ्याकडे पुरावे आहे. पत्राचाळ हे जुने प्रकरण आहे. या जागेवर 47 एकर जमीन आहे, याठिकाणी 672 कुटुंबे भाडेकरू म्हणून राहत आहेत. म्हाडाने 2007 मध्ये गुरु आशिष डेव्हलपर्ससोबत करार केला होता. प्रवीण राऊत हे डिरेक्टर आहेत, त्यांनी करार पाळला नाही. त्यांनी 9 खाजगी बिल्डरांना जमीन विकली. त्यांनी एकूण 1040 कोटी जमा केली. मग या प्रकरणाची चौकशी व्हायला नको का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील…, शिवसेनेने भाजपाला सुनावले

संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात ८३ लाख रुपये जमा झाले. त्यातील ते ५५ लाख रुपये परत करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तोवर ईडीची कारवाई सुरू झाली. याप्रकरणी २०१८ मध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. त्यामुळे संजय राऊत एका पक्षाचे आहेत म्हणून ईडीने तपास न करता प्रकरण बंद करण्याची गरज आहे का असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -