घरताज्या घडामोडी'राहुल गांधी नामक सॅटेलाइट आता लाँच होणे नाही' - संबित पात्रा

‘राहुल गांधी नामक सॅटेलाइट आता लाँच होणे नाही’ – संबित पात्रा

Subscribe

मी सांगतो राहुल नावाचं हे सॅटेलाईट लाँच होऊच शकत नाही, कारण इंधनच संपल आहे. असे म्हणत संबित पात्रा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल.

देशाच्या राजकारणात आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून कायम चर्चेत असणारे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निवडणुकीच्या काळात दरवेळी अनेक पक्षांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु असतो. बरेचदा आरोप-प्रत्यारोप करित असताना आपण काय बोलतो याचे भान राहत नाही. काँग्रेसने केलेल्या आरोपाला उत्तर देताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचे देखील असेच झाले. संबित पात्रांनी एका कार्यक्रमात काँग्रेसवर जोरदार टिका केली. विरोधी पक्ष म्हणून काँग्रस का उभा राहत नाही,असे म्हणत त्यांनी काँग्रसवर टीका केली आहे. मात्र त्यांनी अर्धवटच व्हिडिओ टि्वट केल्याने या विधानातून मोदी सरकारवर टीका केल्याचे वाटत आहे.

- Advertisement -

सध्या दिल्लीत विधानसभेची जोरदार धुमशान सुरु असताना अनेक नेते मंडळी यात सहभागी झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टीव्ही’ने आयोजित केलेल्या चर्चेत संबित पात्रा देखील सहभागी झाले होते. देशभरात इतक्या सगळ्या घटना घडतायत मात्र काँग्रेस आहे तरी कुठे? काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून का उभा राहत नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

नेमके काय म्हणाले ‘संबित पात्रा’

‘इंडिया टीव्ही’ने आयोजित केलेल्या चर्चेत संबित पात्रा काँग्रेसवर टीका करत असताना बोलत होते की “तुम्ही जरा विचार करा देशात अर्थव्यवस्था घसरली आहे. जीडीपी घसरला आहे. कोणाला नोकरी नाही, लोक मरतायत अशी परिस्थिती असताना देखील काँग्रेस पुढे येत नाही. काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे. तसेच देशाचं लष्कर संपल आहे, भारत कुठेच राहीलेला नाही, असे ते म्हणाले. दररोज वर्तमानपत्रात राहुल गांधींच्या रिलाँचींग संदर्भात बातमी असते. मात्र काँग्रेस किती वेळा हे राहुल गांधी नामक सॅटेलाईट लाँच करणार, मी सांगतो हे सॅटेलाईट लाँच होऊच शकत नाही, कारण त्याच्यातील इंधनच संपले आहे. आता यांच्या मदतीस इस्रो आले तरीही हे सॅटेलाइट लाँच होणारच नाही.” अशा प्रकारे त्यांनी काँग्रसवर टीका केलेय.

- Advertisement -

या आधीही घराणेशाहीवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

गतवर्षात भाजपने काँग्रसवर घराणेशाहीचा आरोप केला होता. मागील वर्षी लोकसभेच्या काळात भाजप प्रवक्ते संबित पात्रा त्यांचे हे विधान चर्चेचा विषय ठरले हाते. प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्यावर ‘काँग्रेस पुन्हा एकदा गांधी कुटुंबातच कुबड्याचा आधार शोधत आहे. इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल यांच्यानंतर आता प्रियांकाचे प्रमोशन करण्यात आले आहे’, असे म्हणत पात्रा यांनी घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यानंतर यंदा दिल्लीच्या विधानसभेत राहुल गांधीवर लक्ष करीत ‘हे सॅटेलाइट लाँच होणे नाही’ असे विधान त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -