घरदेश-विदेशभारतीय हद्दीत समझोता एक्स्प्रेस रद्द

भारतीय हद्दीत समझोता एक्स्प्रेस रद्द

Subscribe

लाहोर ते अटारीदरम्यान धावणारी समझोता एक्स्प्रेस भारतीय हद्दीत रद्द करण्याचा भारतीय रेल्वेचा निर्णय

पाकिस्तानकडून समझोता एक्स्प्रेस बंद करण्यात आल्यानंतर आता भारतीय रेल्वेकडूनही लाहोर ते अटारीदरम्यान धावणारी समझोता एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दरम्यान पाकिस्तानने त्यांच्या बाजूला ही रेल्वे चालविण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा- पाकिस्तानने ‘समझोता एक्सप्रेस’ केली बंद

भारतीय रेल्वेकडून समझोता एक्स्प्रेस नवी दिल्लीहून अटारीपर्यंत चालवली जाते तर पाकिस्तानकडून लाहोर ते अटारीपर्यंत चालवण्यात येते. उत्तर रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितल्यानुसार, पाकिस्तानने लाहोर ते अटारीपर्यंत समझोता एक्स्प्रेस न चालविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे दिल्ली ते अटारीदरम्यानची लिंक एक्स्प्रेस रद्द करण्यात येत आहे.

- Advertisement -

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी या गाडीसाठी दोन प्रवाशांनी तिकिट आरक्षित केले होते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

…म्हणून भारतीय हद्दीत समझोता एक्स्प्रेस रद्द

भारताने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्स्प्रेस आणि थार एक्स्प्रेस न चालविण्याचा निर्णय घेण्यात आला तर गेल्या आठवड्यात समझोता एक्स्प्रेस भारताच्या हद्दीवरच थांबविण्यात आली. पाकिस्तानी चालकांनी ही रेल्वे भारतीय हद्दीत नेणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन ही रेल्वे परत आणली होती. याच पार्श्वभूमीनंतर आज ही रेल्वेकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -