घरटेक-वेकसॅमसंग आणि अॅप्पलला कडवी टक्कर, गुगल सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत

सॅमसंग आणि अॅप्पलला कडवी टक्कर, गुगल सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत

Subscribe

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी Google Pixel 7 Series नुकतीच भारतात लॉन्च करण्यात आली होती. या सीरिजला ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिला. भारतात Google स्मार्टफोन (Google Smartphone) लॉन्च करण्याची ही पहिलीच वेळ होती. या सीरिजमध्ये पिक्सेल ७ आणि ७ प्रो असे २ स्मार्टफोन समाविष्ट होते. उत्तम कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसर असलेले हे दोन्ही शक्तिशाली स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरले होते. पण आता गुगल कंपनी सॅमसंग आणि अॅपलला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. गुगलकडून आता आणखी अपडेटेड स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. गुगल G10 हा मोबाईल लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा – मालकाला सलाम! कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून दिले कार आणि बाईक

- Advertisement -

गुगल पिक्सेल ७ ला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर कंपनीने आणखी उच्च स्पीड असलेला मोबाईल आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. गुगल पिक्सेल ७ सीरिज ग्राहकांच्या पसंतीस उतरला असल्याने गुगलच्या या नव्या फोनसाठी ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. –

नव्या स्मार्टफोनचे फिचर कसे असणार?

- Advertisement -

Google च्या नवीन स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे कोड नाव G10 आहे आणि वापरकर्त्यांना यात हाय-टेक डिस्प्ले आणि उच्च रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळू शकणार आहे. माहितीनुसार, G10 चा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येणार आहे. यामध्ये बसवलेला डिस्प्ले 1440×3120 पिक्सेल रिझोल्यूशनचा आहे. जो सध्याच्या Pixel 7 Pro पेक्षा खूपच चांगला आणि स्मूद असेल. तसेच मोबाईलचं डिझाइनही आकर्षक असणार आहे.

हेही वाचा – आता २४ तासांत होणार कारवाई; फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी केंद्र सरकारने आयटी नियम बदलले

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -