घर देश-विदेश Sanatan Dharma : मोदी अन् त्यांचे सहयोगी...; सनातन धर्माचा उल्लेख करत उदयनिधींचा...

Sanatan Dharma : मोदी अन् त्यांचे सहयोगी…; सनातन धर्माचा उल्लेख करत उदयनिधींचा हल्लाबोल

Subscribe

Sanatan Dharma : उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माविरोधात (Sanatan Dharma) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी (BJP) त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर आता द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी आज (7 सप्टेंबर) त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा नेत्यांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला आहे, परंतु मी या सर्व प्रकरणी कायदेशीर कारवाईला सामोरे जाणार आहे, असे सांगतानाच उदयनिधी स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार हल्ला चढवला आहे. मणिपूर हिंसाचारावर निर्माण झालेल्या प्रश्नांना सामोरे जाण्याची भीती मनात असल्याने मोदी जगभर फिरत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. (Sanatan Dharma Modi and his allies Udayanidhis attack by mentioning Sanatan Dharma)

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांपासून भाजपाची सर्व आश्वासने पोकळ ठरली आहेत. भाजपाने जनतेच्या कल्याणासाठी काय केलं? असा प्रश्न उपस्थित करत संपूर्ण देश फॅसिस्ट भाजपा सरकारच्या विरोधात एकजुट होत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांनी टीएनपीडब्ल्यूएए परिषदेतील माझ्या भाषणाचा विपर्यास करून ‘नरसंहार भडकावणारे’ असे म्हटले आहे. खरं तर ते स्वतःला वाचवण्यासाठी माझा वापर करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Aditya-L1 : सेल्फी क्लिक करून आदित्य-एल1 ने कार्यरत असल्याचे दाखविले; पृथ्वी अन् चंद्राचे पाठवले फोटो

अस्तित्व टिकण्यासाठी भाजपाकडून माझ्यावर आरोप

उदयनिधी म्हणाले की, केंद्रीय मंत्री अमित शाहा आणि भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री ‘फेक न्यूज’च्या आधारे माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत, खरं तर हे धक्कादायक आहे. त्यामुळे मी त्याच्याविरुद्ध फौजदारी खटले आणि इतर न्यायालयीन खटले दाखल केले पाहिजेत. कारण त्यांनी सन्माननीय पदांवर असताना माझी बदनामी केली आहे. खरं तर त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवायचे आहे, परंतु अस्तित्व कसे टीकवायचे हे त्यांना माहित नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर न्यायालयीन खटले दाखल करणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – भाजप नेते अमित मालवीयांविरोधात FIR दाखल; उदयनिधी स्टॅलिन संदर्भात केलेलं वक्तव्य भोवलं

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) राजधानी चेन्नईमध्ये एका सभेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया, कोरोनासारख्या आजारांसोबत केली. ते म्हणाले की, ‘मच्छर, डेंग्यू, कोरोना हे असे रोग आहेत, ज्यांचा आम्ही विरोध करु शकत नाही तर, त्यांचे समूळ उच्चाटन करावं लागतं. सनातन धर्म देखील असाच आहे. सनातनचा फक्त विरोध करुन चालणार नाही तर, त्याला मूळ संपवावे लागणार आहे.

- Advertisment -