घरदेश-विदेशउदयनिधींना सुप्रीम कोर्टाची नोटीस; द्रमुक आणि तामिळनाडू सरकारलाही उत्तर द्यावं लागणार

उदयनिधींना सुप्रीम कोर्टाची नोटीस; द्रमुक आणि तामिळनाडू सरकारलाही उत्तर द्यावं लागणार

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. त्यांच्याशिवाय तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकलाही नोटीस बजावण्यात आली आहे. तुम्ही असे वक्तव्य का केले आणि त्याची गरज काय होती, असा सवाल न्यायालयाने केला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी नुकतेच सनातन धर्म नष्ट करण्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. त्यांच्याशिवाय तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकलाही नोटीस बजावण्यात आली आहे. तुम्ही असे वक्तव्य का केले आणि त्याची गरज काय होती, असा सवाल न्यायालयाने केला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या वकिलाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या याचिकेत मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी यांच्या सनातन धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. (Sanatan Dharma The Supreme Court has issued a notice to Udayanidhi Stalin and the ruling party in Tamil Nadu DMK )

न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.

- Advertisement -

याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, राज्य सरकारने एक परिपत्रकही जारी केले आहे, ज्यामध्ये मुलांना सनातन धर्माविरुद्ध बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. या युक्तिवादांशी सहमती दर्शवत न्यायालयाने याचिका स्वीकारली आणि उदयनिधी स्टॅलिन, तामिळनाडू सरकार आणि द्रमुक यांना नोटीस बजावली. 2 सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपुष्टात आणण्याबाबत बोलले होते, त्यामुळे गदारोळ झाला होता. याबाबत भाजपने इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत काँग्रेसला जाब विचारला आहे.

हाच सनातन धर्म का?

सुमारे 800 कोटी रुपये खर्चून बांधलेलं नवं संसद भवन हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता, यावर उदयनिधी स्टॅनिल यांनी भर दिला. तरीही भारताच्या प्रथम नागरिक असूनही देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आलं नाही. त्यांच्या आदिवासी पार्श्वभूमीवर आणि त्या विधवा असल्यानं त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं होतं, हाच सनातन धर्म आहे का? असा सवाल उदयनिधी यांनी उपस्थित केला होता.

- Advertisement -

(हेही वाचा: Nari Shakti Bill : स्थिर सरकार असल्याने नारी शक्ती वंदन कायदा वास्तवात उतरला – पंतप्रधान )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -