घरदेश-विदेशगौरी लंकेश हत्येप्रकरणी आम्ही 'सॉफ्ट टार्गेट' - सनातन संस्था

गौरी लंकेश हत्येप्रकरणी आम्ही ‘सॉफ्ट टार्गेट’ – सनातन संस्था

Subscribe

दिवंगत पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात अटक केल्यानंतर ते सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आज सनातन संस्थेनं या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. गौरी लंकेश प्रकरणात सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीचा कोणताही सहभाग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी आज एक प्रसिद्धीपत्रक काढून या प्रकरणात आम्हाला ‘सॉफ्ट टार्गेट’ बनवलं जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. सेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते यांना संपवण्याचे हे षडयंत्र असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बंगळुरूमध्ये ५ सप्टेंबर २०१७ रोजी पत्रकार गौरी लंकेश यांच्या गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

नक्षलवाद्यांशी संबंध ठरले मृत्यूस कारण ?

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. लंकेश यांचे सख्खे भाऊ इंद्रजीत हे सातत्याने गौरी लंकेश यांच्या हत्येला कर्नाटकातील तत्कालीन काँग्रेसचे सिद्धरामय्या सरकार उत्तरदायी आहे, असे जाहीरपणे सांगत आहेत. गौरी लंकेश यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध आणि काँग्रेस सरकारच्या काळात लयाला गेलेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती, हे त्यांच्या हत्येला कारणीभूत आहेत, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

हिंदु युवा सेनेचे प्रमुख के. टी. नवीनकुमार यांना त्यांच्या तीन कार्यकर्त्यांसह शस्त्रविक्री करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. काही दिवसांनी त्या तिघांना पोलिसांनी सोडून दिले. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांकडे जाऊन के.टी. नवीनकुमार यांचा या हत्येशी कुठलाही संबंध नसून पोलिसांनी मारहाण करून आमच्याकडून बळजबरीने हे सर्व लिहून घेतले, असे सांगितले होते.
चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

- Advertisement -

विचारवंतांच्या हत्येचा सिलसिला

डॉ. नरेंद्र दाभोलकर, पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटकात प्रा. एम.एम. कलबुर्गी

पाच वर्षांपूर्वी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक – कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कोल्हापूरमध्ये ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे तर कर्नाटकात प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्याही हत्या झाल्या. मात्र अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना गजाआड करण्यात तपासयंत्रणांना अद्याप यश आले नाही. गेल्या वर्षी लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांचीही अशाचप्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -