माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या ‘त्या’ ठरल्या पहिल्या वयस्कर महिला

sangeeta bahl
संगीती बहल

प्रचंड इच्छाशक्ती, धैर्य आणि चिकाटीच्या बळावर अनेक आव्हानांना सामोरे जात देशाच्या अनेक गिर्यारोहकांनी इतिहासाच्या पानांवर सोनेरी अक्षरांनी आपले नाव सजविले आहे. या गिर्यारोहकांमध्ये महिलांनीही मोठमोठ्या उंच शिखरावर आपले नाव उमटवत देशाचे नाव उज्जवल केले आहे. आता अशाच एका महिला गिर्यारोहक संगीता बहल यांनी वयाच्या ५३व्या वर्षी जगातील सर्वात उंच शिखर मानल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्ट सर केली आहे.

एव्हरेस्ट सर करणाऱ्या देशाच्या सर्वात वयस्कर महिला असल्याचा किताब
संगीता बहल यांनी २० मे रोजी वयाच्या ५३व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. त्यामुळे त्यांना माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या वयस्कर महिलाचा किताब मिळाला आहे. या अगोदर हा किताब प्रेमलता अग्रवाल यांना मिळाला होता. वयाच्या ४८ व्या वर्षी प्रेमलाता यांनी माउंट एवरेस्ट सर केला होता. संगीता यांनी हा रेकॉर्ड मोडत वयाच्या ५३व्या वर्षी एवरेस्टची सर केली.

कोण आहेत संगीता बहल?
संगीता बहल या हरियानाच्या गुरुग्रामच्या रहिवाशी असून त्यांना गिर्यारोहनाची प्रचंड आवड आहे. आता पर्यंत त्यांनी जगातील सात सर्वोच्च शिखरांपैकी सहा शिखर सर केली आहेत. त्यामध्ये आताच्या माउंट एव्हरेस्ट बरोबरच २०११ मध्ये किलिमंजारो, २०१३ मध्ये एलब्रस, २०१४ मध्ये विंसन, २०१५ एंकांकागुआ आणि कोसियुस्ज़को शिखर या पाच शिखरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी वयाच्या ४७व्या वर्षी गिर्यारोहन करायला सुरुवात केली. त्यांचे पती, अंकुर बहल सुद्धा गिर्यारोहकच आहेत. त्यांनी २०१६ मध्ये माउंट एव्हरेस्टवरती सर केली आहे.

या अगोदरही एव्हरेस्ट सर करण्याचा केला होता प्रयत्न
संगीता बहल यांनी या अगोदरही माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, प्रकृती बिघडल्याने त्यांना तो सर रद्द करावा लागला होता. परंतु, या दुसऱ्या प्रयत्नात त्या जिंकल्या.

एव्हरेस्ट सर केल्यानंतर फेसबुक पोस्ट
संगीता बहल यांनी सर करुन आल्यानंतर फेसबुकवर या गोष्टीची बातमी लोकांना दिली. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी सांगितले होते की, “माउंट एव्हरेस्ट सारख्या महाकाय शिखर सर केल्यानंतर मी नुकतेच काठमांडूमध्ये परतली आहे. आपल्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि प्रार्थनांमुळेच हे शक्य झाले. त्यामुळे सर्वांची अभारी आहे.”