२३ जून १९८० मध्ये विमान दुर्घटनेत संजय गांधी यांचा झाला होता संशयास्पद मृत्यू ; घटनेला आज ४२ वर्ष पूर्ण

२३ जून रोजी संजय गांधी पुन्हा या विमानात बसले, मात्र या वेळी हे विमान अचानक तीन लूप घेतल्यानंतर चौथा लूप घेते वेळी संजय गांधींसोबत असणाऱ्या कॅप्टन सक्सेना यांच्या सहकार्याच्या लक्षात आले की विमानाचे इंजिन बंद पडले आहे

२३ जून १९८० हा दिवस भारतीय राजकारणातला सर्वात वाईट दिवस मानला जातो. कारण याचं दिवशी इंदिरा गांधी यांचा लहान मुलगा संजय गांधी विमान दुर्घटनेत संजय गांधी यांचे निधन झाले. या बातमीने संपूर्ण भारतातून शोक व्यक्त केला गेला.खरंतर संजय गांधी यांना विमान आणि कार वेगाने उडवण्याचे आकर्षण होते. १९७६ मध्ये संजीव गांधी यांना कमी वजनाचे विमान उडवण्याचा परवाना मिळाला होता. आणीबाणीनंतर मोरारजी देसाई यांच्या सरकारने त्यांचा हा परवाना रद्द केला होता. मात्र इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यावर संजय यांना पु्न्हा हा परवाना मिळाला.

मे १९८० मध्ये धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी संजय यांच्यासाठी ‘पिट्स एस २ए’ विमान भारतात आणले. संजय गांधी यांना या विमानाची करायची होती. पण त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना ही परवानगी देण्यात आली नाही. संजय गांधी विमानाचे उड्डाण करण्यापूर्वी २० जून १९८० रोजी तपासणी म्हणून या विमानाचे उड्डाण करण्यात आले. त्याच्याच दुसऱ्या दिवशी २१ जून रोजी संजय गांधी यांनी उड्डाण केले. २२ जून रोजी इंदिरा गांधी, मेनका, आर.के धवन आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी सुद्धा उड्डाण केले. २३ जून रोजी संजय गांधी पुन्हा या विमानात बसले, मात्र या वेळी हे विमान अचानक तीन लूप घेतल्यानंतर चौथा लूप घेते वेळी संजय गांधींसोबत असणाऱ्या कॅप्टन सक्सेना यांच्या सहकार्याच्या लक्षात आले की विमानाचे इंजिन बंद पडले आहे.

दरम्यान विमानाने वेगाने वळण घेतले आणि ते अचानक जमिनीवर आदळले. हे विमान खाली आदळून विमानाला आग लागली होती. संजय गांधी आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र काही वेळाने डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. आज या घटनेला ४२ वर्ष पूर्ण झाले आहेत.