Homeदेश-विदेशRBI Governor: संजय मल्होत्रा रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर; 11 डिसेंबरला पदभार स्वीकारणार

RBI Governor: संजय मल्होत्रा रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर; 11 डिसेंबरला पदभार स्वीकारणार

Subscribe

महसूल सचिव संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर असतील. रिझर्व्ह बॅंकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या जागी मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : महसूल सचिव संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर असतील. रिझर्व्ह बॅंकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या जागी मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (sanjay malhotra to be new reserve bank of india governor after shaktikanta das)

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 1990 बॅचचे आयएएस अधिकारी आणि सध्या महसूल विभागाचे सचिव असलेल्या संजय मल्होत्रा यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. 11 डिसेंबर 2024 पासून त्यांचा कार्यकाळ सुरू होईल. विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ASI Vs Waqf : देशभरातील 250 स्मारकांची वक्फच्या नावे नोंदणी, एएसआयचा धक्कादायक अहवाल

आयएएस अधिकारी संजय मल्होत्रा यांच्याकडे अर्थ, कर, वीज, औद्योगिक आणि खाणकामसह अन्य प्रमुख क्षेत्रातील 33 वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव आहे. प्रदीर्घ अनुभव असलेले मल्होत्रा हे रिझर्व्ह बॅंकेचे 26 वे गव्हर्नर असतील. विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या, मंगळवारी संपणार आहे.

- Advertisement -

डिसेंबर 2018 मध्ये आरबीआय गव्हर्नर म्हणून पदभार स्वाकारलेल्या दास यांनी जवळपास पाच वर्षे आरबीआयचा कारभार सांभाळला आहे. कॅबिनेटने नियुक्त केलेल्या समितीने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 1990 बॅचचे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी संजय मल्होत्रा हे 11 डिसेंबर 2024 रोजी आरबीआय गव्हर्नर म्हणून कार्यभार स्वीकारतील आणि त्यांचा कर्यकाळ 3 वर्षांचा असेल.

महागाई आणि आर्थिक विकास अशा महत्त्वाची आव्हाने सध्या आरबीआय समोर आहेत. आणि अशाच वेळी मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या महसूल विभागाचे सचिव असलेले मल्होत्रा हे आर्थिक सेवा विभागातही सचिव होते.

आयआयटी कानपूर येथून कॉम्प्युटर विज्ञान विषयात इंजीनिअरिंग केलेल्या मल्होत्रा यांनी अमेरिकेतील प्रिंसटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणाशी संबंधित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. राज्य आणि केंद्र अशा दोन्हींसाठी त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कारण, विविध क्षेत्रातील अनेक धोरणे त्यांनी आखली आहेत.

हेही वाचा – Rohinton Fali Nariman : आधी राम मंदिराच्या निर्णयावर प्रश्न, आता न्यायमूर्तींनी EWS आरक्षणाला म्हटले चुकीचे

डिसेंबर 2022 पासून ते महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. तेव्हापासून त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही करांसाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे करात वाढ झाली. देशाच्या गंगाजळीवरही याचा सकारात्मक परिणाम झाला.

दरम्यान, तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी अचानक राजीनामा दिल्याने विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 12 डिसेंबर 2018 रोजी या पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 रोजी संपणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती होण्याआधी दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एक प्रमुख अधिकारी होते. सरकार आणि मध्यवर्ती बॅंकेतील संबंध सुधारण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -