घरदेश-विदेशOdisha Train Accident : संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले; "सीबीआय चौकशी म्हणजे..."

Odisha Train Accident : संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले; “सीबीआय चौकशी म्हणजे…”

Subscribe

ओडिशातील ट्रेन दुर्घटना ही देशाच्या इतिहासातील भयावह घटना आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून केंद्रावर हल्लाबोल केला. तर या अपघाताची सीबीआय चौकशी म्हणजे वेळकाढूपणा आहे, असे सांगत त्यांनी केंद्रावर टीका केली.

ओडिशातील ट्रेन दुर्घटना ही देशाच्या इतिहासातील भयावह घटना आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी आजच्या (ता. 05 जून) पत्रकार परिषदेतून केंद्रावर हल्लाबोल केला. तर या अपघाताची सीबीआय चौकशी म्हणजे वेळकाढूपणा आहे, असे सांगत त्यांनी केंद्रावर टीका केली. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोरोमंडल ट्रेनला झालेल्या अपघातावरून सरकारवर टीकास्त्र डागले आहे. शुक्रवारी (ता. 02 जून) संध्याकाळी ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल ट्रेनला अपघात झाला. या ट्रेनने लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. त्यानंतर या ट्रेनची धडक समोरून येणाऱ्या आणखी एका ट्रेनला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामुळे 288 निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे.

हेही वाचा – Odisha Train Accident : ‘कोरोमंडल’ अपघाताने सर्व ‘फुग्यां’मधील हवा काढली, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ओडिशातील ट्रेन दुर्घटना ही देशाच्या इतिहासातील भयावह घटना आहे. पंतप्रधान जेव्हा गेले तेव्हा तिथे मोदी मोदी असे नारे देण्यात आले. रेल्वेमंत्री हे ओडिशाचे आहेत. सुरक्षा कवच बद्दल बोलण्यात आले. पण ते सुरक्षा कवच कुठे आहे. खोटे आश्वासन देतात आणि मोठ्यामोठ्या गोष्टी करतात. बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन याबद्दल बोलण्यात येते. पण जी ट्रेन सुरू आहे, त्या नीटपणे चालवाव्यात, असे म्हणत त्यांनी यावेळी केंद्रातील यंत्रणेवर निशाणा साधला.

या घटनेमधील मृतांना अस्थावस्त टाकण्यात आले होते. मृतदेह हे लावारिसाप्रमाणे पडलेले होते. आता रडून काय होणार आहे. आता या प्रकरणी सीबीआयची चौकशी करण्यात येणार आहे. काही लोक म्हणतात, हा अपघात नाही तर घातपात आहे. मग तुमची सरकार काय करतेय, तुमचं गृहमंत्रालय काय करतंय? रेल्वेचा तांत्रिक विभाग काय करतंय? या प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार? ही सरकारची किंवा रेल्वे मंत्र्यांची जबाबदारी नाही का? असे प्रश्न संजय राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

ज्यावेळी लालबहादूर शास्त्री, माधवराव सिंधीया यांच्या काळात असे अपघात झाले होते, तेव्हा त्यांनी राजीनामे दिले होते. पण हे सरकार तर या अपघाताचा पण इव्हेंट करतेय, असे म्हणत राऊतांकडून मोदी सरकारवर टीका करण्यात आली. या देशात याआधी कधी असे झाले नाही. तर या प्रकरणातील सीबीआय चौकशीवर भाष्य करत संजय राऊत म्हणाले की, जिथे सीबीआय चौकशीचे आदेश द्यायला हवेत, तिथे दिले जात नाही. अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पण त्याबाबत आदेश दिले जात नाही. त्यामुळे या अपघात प्रकरणातील हा वेळकाढूपणा आहे. तर ज्या सुरक्षा कवचचा गाजावाजा करण्यात आला, ते आहे कुठे असे म्हणत टीकास्त्र डागण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -