घरदेश-विदेशसंभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची उडी फसली, संजय राऊतांचा भाजपला...

संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची उडी फसली, संजय राऊतांचा भाजपला टोला

Subscribe

राऊत म्हणाले की, "शाहू महाराजांप्रती ज्याप्रकारे आम्हाला आदर आहे. त्याप्रकारे संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी देखील आम्हाला प्रेम आहे. या वादातून आता कोणतेही राजकारण करायचे नाही. ज्यांनी संभाजी राजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला,

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या मुद्द्यावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. “संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची उडी फसली अशा शब्दात राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. (Sanjay Raut Kolhapur Visit)

राऊत म्हणाले की, “शाहू महाराजांप्रती ज्याप्रकारे आम्हाला आदर आहे. त्याप्रकारे संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी देखील आम्हाला प्रेम आहे. (shrimant Shahu chhatrapati) या वादातून आता कोणतेही राजकारण करायचे नाही. ज्यांनी संभाजी राजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांची उडी फसलेली आहे. त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला. काल शाहू महाराजांनी आपली भूमिका घेतली. शिवसेनेचे (shivsena) मनं साफ आहे, शिवसेना कधीही पाठी मागून वार करत नाही. आम्ही भूमिका स्पष्ट केली होती की, दोन जागा शिवसेनेच्या आहेत. राज्यसभेवर आपल्याला जायचे असेल तर आपण शिवसेनेची उमेदवारी घ्या, तुम्हाला आम्ही शिवसेनेची मत देऊ… छत्रपतींना समर्थक नसतात,संपूर्ण प्रजा छत्रपतींची असते”. (rajya sabha election 2022)

- Advertisement -

“श्रीमंत छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी आदरणीय आहेत. दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांचे आणि शाहू महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. कौटुंबिक नातं होतं आजही आहे. काल त्यांच्या भूमिकेवर मी इतकचं म्हणेन की, कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही प्रामाणिकपणा आणि सत्य जिवंत आहे, शाहू घराण्याने सत्यपणा ही त्यांची परंपरा आजही कायम ठेवली आहे. कोल्हापूरात असताना शाहू महाराजांना भेटून त्यांना अभिवादन करणे कर्तव्य आहे,” असही राऊत म्हणाले.

“महाविकास आघाडी म्हणूनचं ठरलं पाहिजे नाही तर…”

कोल्हापूर एकत्रित निवडणुकीच्या मुद्द्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “कोल्हापूरमध्ये मंडलिक साहेब आहे, राजेश शिरसागर रुग्णालयात आहेत. काल सर्व शिवसेनेचे लोक होते. महाविकास आघाडीतील लोकांचा माझा संपर्क सुरु आहे. आता फक्त एका दोघांच ठरलं हे चालणार नाही. इथे महाविकास आघाडी म्हणूनचं ठरलं पाहिजे नाही तर आम्ही ठरवू आणि आमचा निर्णय घेऊ,” असा इशारा राऊतांनी दिला आहे.

- Advertisement -

ओवैसींच्या शरद पवार-मोदी भेटीच्या आरोपांवर राऊतांचे उत्तर 

ओवैसींच्या शरद पवार-मोदी भेटीच्या आरोपांना प्रतिउत्तर देत राऊत म्हणाले की, ओवैसींकडे जास्त माहिती असेल. ते औरंगजेबाचा विषय सोडून या विषयाकडे कसे वळले? अनिल देशमुख यांचाही विषय त्यांनी काढला नसावा. नवाब मलिकचं कशाला देशात विषय खूप आहेत. पंतप्रधानांच्या भेटीत अनेक विषय येत असतात. त्यातला कदाचित माझा विषय असेल, असं राऊ म्हणाले. (Asaduddin Owaisi On Sanjay Raut)



Asaduddin Owaisi : शरद पवारांनी संजय राऊतांसाठी मोदींची भेट घेतली मग मलिकांसाठी का नाही? ओवैसींचा सवाल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -