पंतप्रधान स्वत: सांगताहेत आम्ही 10 लाख नोकऱ्या देऊ, त्यावर त्यांनी कायम राहावे – संजय राऊत

Sanjay Raut

संजय राऊत अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत अदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान स्वत: सांगताहेत आम्ही 10 लाख नोकऱ्या देऊ. त्यावर त्यांनी कायम राहावे, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.

अदित्य ठाकरेंचा दौरा –

आदित्य ठाकरे 4.30 वाजता पत्रकार परिषद घेतील, 5 वाजता रामाचे दर्शन घेतील, 6 वाजता ते लक्ष्मन कीला येथे भेट देतील, राम मंदीर निर्माण कार्यस्थळी ते भेट देणार आहेत, त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या हस्ते नया घाटावर शरयु नदीची आरती होणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

विरोधी पक्षांची बैठक –

या वेळी संजय राऊत यांना राष्ट्रपती निवडणूकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार साहेब मोठे नेते आहेत. ते देशातील अनुभवी नेते आहेत. जेव्हा या पद्धतीच्या निवडणूका येतात तेव्हा आम्ही पवार साहेबांकडून मार्गदर्शन घेतो. 15 तारखेला एक बैठक होणार आहे. ती बंगलच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे. या बैठकीला देशातील सगळ्या विरोधी पक्षाचे नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीचे नेतृत्व शरद पवार साहेब करणार आहेत. आम्ही आयोध्ये त असल्यामुळे या बैठकीला जाणार नाही. मात्र, आमच्याकडून एक प्रमुख नेते तेथे जाणार आहेत. या बैठकीत राष्ट्रपती निपडणूकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राष्ट्रपती पदाबाबत वक्तव्य –

राष्ट्रपती पदाबाबत शरद पवारांच्या नावा विषयी संजय राऊत यांनी केलेल्या विधाना बाबत विचारले असता त्यांनी देशाला राष्ट्रपती पाहीजे तर शरद पवार साहेब आहेत. रबर स्टॅप पाहीजे तर भरपूर लोक लाईनमध्ये ऊभे आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधानांनी त्यावर कायम राहवे –

मी पंतप्रधानांच्या नोकरी विषयीच्या ट्विटचे स्वागत करतो. त्यांनी दोन करोड नोकऱ्या देण्याची मागणी केली होती. तो आकडा भाजपवाले 5 करोड पर्यंत घेऊन गेले होते. पण आज पंतप्रधान स्व:ता सांगत आहेत आम्ही दहा लाख नोकऱ्या देऊ त्यावर त्यांनी कायम राहवे. दहा लाख नोकऱ्या मिळाल्यास आम्ही त्याचे स्वागत करू. ही विरोध करायची गोष्ट नाही. रोजगार मीळ असेल तर सरकारच्या या योजनेचे स्वागत करू, असे संजय राऊत म्हणाले.