घरदेश-विदेश5 अंश सेल्सिअस तापमान, पावसाची संततधार, गळ्यात भगवी मफरल; गांधींसोबत राऊतांची पायी वारी

5 अंश सेल्सिअस तापमान, पावसाची संततधार, गळ्यात भगवी मफरल; गांधींसोबत राऊतांची पायी वारी

Subscribe

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra | जम्मूचे तापमान ५ अंश सेल्सिअस असून तिथे पावसाची संततधार आहे. अशा वातवरणातही संजय राऊत यांनी १२ किमीची पदयात्रा केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra | जम्मू – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा अंतिम टप्पा सुरू आहे. भारत जोडो यात्रा सध्या जम्मूमध्ये असून या टप्प्यात शिवसेना खासदार संजय राऊतही सामिल झाले. जम्मूचे तापमान ५ अंश सेल्सिअस असून तिथे पावसाची संततधार आहे. अशा वातवरणातही संजय राऊत यांनी १२ किमीची पदयात्रा केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संजय राऊत यांच्या हृदयात सहा स्टेन्स आहेत. अशा परिस्थितीतही संजय राऊत यांनी रेनकोट न घालताही राहुल गांधी यांच्यासोबत पायवारी केली. 5 अंश सेल्सिअस तापमान, पावसाची संततधार आणि गळ्यात भगवी मफरल घालून राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत संजय राऊत यांनी १२ किमी पदयात्रा केली.

- Advertisement -


काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळी विचारधारा असलेले पक्ष आहेत. मात्र, तरीही काँग्रेसच्या साथीने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यामुळे या सरकारला अनैसर्गिक सरकार असल्याचा ठपका बसला होता. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतरही महाविकास आघाडीचं कार्य सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष या नात्याने संजय राऊतांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली होती तेव्हा संजय राऊत नुकतेच तुरुंगातून सुटून बाहेर आले होते. त्यामुळे त्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे या यात्रेच्या अंतिम टप्प्यांत संजय राऊतांनी भारत जोडो यात्रेला हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेच्या पदयात्रेत आदित्य ठाकरेंनी आवर्जून हजेरी लावली  होती. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्रित फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. विरोधकांनीही या फोटोवरून प्रचंड टीका केली होती.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. कन्याकुमारी ते जम्मू असा त्यांचा प्रवास असून लवकरच त्यांच्या या भारत जोडो यात्रेची सांगता होणार आहे. सध्या ही यात्रा जम्मूत असून जम्मूतील काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -