घरताज्या घडामोडीराकेश टिकैत यांच्याशी चर्चा केल्यावर UP मधील जागा लढवण्याबाबत निर्णय, संजय राऊतांचे...

राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केल्यावर UP मधील जागा लढवण्याबाबत निर्णय, संजय राऊतांचे वक्तव्य

Subscribe

संयुक्त किसान मोर्चाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. राकेश टिकैत फार राजकारणात नाही. तरिही त्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर काय चर्चा होते ते पाहू पण यूपीच्या सर्व भागात ५० ते १०० उमेदवार लढवण्याबाबत ठरलं आहे. अनेक लहान लहान घटक आहेत.

शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांची उत्तर प्रदेशमध्ये भेट घेतल्यानंतर युपीमधील किती जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. संजय राऊत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मथुरा, मेरठमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमधील समस्या आणि राजकीय वातावरणाचा आढावा घेतल्यानंतर जागा ठरवण्यात येणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये ५० ते १०० जागांवर निवडणूक लढवणार असून विधानसभेत आमचा आमदार बसणारच असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार मेरठ, मथुरामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख राकेश टिकैत ज्यांनी शेतकऱ्यांसोबत आंदोलनात लढा दिला. त्यांची भेट घेणार आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांविषयी मत आणि त्यांचा कल समजून घेणार आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या कोणत्या भागात किती उमेदवार उतरवायचे याबाबत आढावा घेणार आहे. दुपारी १२.३० वाजता राकेश टिकैत यांची भेट घेणार असल्याचे राऊत म्हणाले.

- Advertisement -

संयुक्त किसान मोर्चाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. राकेश टिकैत फार राजकारणात नाही. तरिही त्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर काय चर्चा होते ते पाहू पण यूपीच्या सर्व भागात ५० ते १०० उमेदवार लढवण्याबाबत ठरलं आहे. अनेक लहान लहान घटक आहेत. ते भेटत आहेत आणि शिवसेनेने निवडणूक लढवून अस्तित्व दाखवायला पाहिजे. लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी उत्तर प्रदेशची गरज आहे. मला खात्री आहे यावेळीला ज्या पद्धतीने निवडणूक लढवण्याचे ठरवतो आहे. सगळे खासदार, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या निवडणुकीमध्ये लक्ष घालून आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार असतील अशी खात्री असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

गोव्यातील स्थानिक काँग्रेसच्या डोक्यात काय चाललंय?

काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाहीत आम्ही प्रस्ताव ठेवला आहे. गोव्यात आपण एकत्र लढू महाराष्ट्रात एकत्र आहोत. राहुल गांधींशी चर्चा केली असून ते सकारात्मक आहेत. परंतु गोव्यातील राजकीय नेतृत्वाच्या डोक्यात काय आहे माहिती नाही. त्यांना सांगितले आहे की, ३० जागा तुम्ही लढा आणि आम्ही १० जागा मागितल्या आहेत. जिथे काँग्रेस कधीच जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितले आहेत. काँग्रेसच्या खिशातले आमदार मागितले आहे. एकत्रित लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डि़जीटमध्येही येणार नाही अशी आवस्था आहे. असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : sindhudurg bank election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची आज निवड, नारायण राणे कोणाच्या नावाला पसंती देणार?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -