घरताज्या घडामोडीशिवसेना-राष्ट्रवादीशिवाय गोव्यात सरकार बनणार नाही, संजय राऊतांचा विश्वास

शिवसेना-राष्ट्रवादीशिवाय गोव्यात सरकार बनणार नाही, संजय राऊतांचा विश्वास

Subscribe

गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. गोव्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर ते म्हणाले की, गोवामध्ये नक्की काय झालं आणि आम्हाला काय करायचं होतं. याबाबत खासदार प्रफुल पटेल यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही सुरळीतपणे सुरू आहे. तसेच एक समान कार्यक्रमानुसार राज्यात एक आदर्श सरकार आहे. दरम्यान, आमच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही, यावर आम्हाला विश्वास आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

आमच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही

गोव्यामध्ये बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक घेतली. या बैठकीमध्ये या दोन्ही पक्षांनी पत्रकार परिषद घेतली असता, संजय राऊत म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी निर्णय घेतलाय की, आम्ही दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहोत. प्रफुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही ४० जागांवर निवडणूक लढणार नाही आहोत. आमच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही, यावर आम्हाला विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रात निवडणुकीनंतर युती ठरवली जाते. परंतु गोव्यामध्ये निवडणुकीआधी शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांनी मिळून निवडणूक लढवण्यासाठी आणि युतीसाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील युतीसाठी प्रयत्न केला. मी सुद्धा गोव्यामध्ये त्यांच्या दिग्गज नेत्यांसोबत माझ्या अनेक बैठका झाल्या. परंतु मी काल सुद्धा सांगत होतो आणि आजही सांगतोय की, त्यांना स्वबळावर सरकार स्थापन करायचं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना धन्यवाद देतो.

आयाराम-गयारामवाली राजकीय खेळी बंद होईल

आयाराम गयाराम हा शब्द हरियाणापुरता मर्यादीत होता. परंतु त्यानंतर संपूर्ण देशात तो शब्द वापरण्यात आला. परंतु हरियाणानंतर आयाराम गयाराम हा शब्द कोणाला लागू होता. तर त्याचं नाव गोवा आहे. गोव्यात घाणेरड्या पद्धतीचं राजकरण केलं जातं हे आम्ही कुठेच पाहीलं नव्हतं. मला वाटतं की, गोव्याची जनता या सर्व पक्षांना कंटाळली आहे. गोव्यातील जनता दुसरा पर्याय निवडण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातील जनता आणि मतदार आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतील. गोव्यातील जनतेला मदत करण्यासाठी एक संधी देण्यासाठी मी सांगणार आहे. जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गोव्यामध्ये ताकद मिळाली तर आयाराम-गयारामवाली राजकीय खेळी बंद होईल, असा माझा विश्वास आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या मतदार संघातून लढणार आणि कोणाला संधी मिळणार, याबाबत आम्ही उद्या घोषणा करणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : प्राणी संग्रहालयात कोरोनाचा विळखा! तपासणी दरम्यानच सिंह – बिबट्याचा मृत्यू, तर ७० कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणं


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -