Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशSanjay Raut : भाजपच्या राज्यात तेवढेच स्वस्त आहे..., खासदार संजय राऊतांची बोचरी...

Sanjay Raut : भाजपच्या राज्यात तेवढेच स्वस्त आहे…, खासदार संजय राऊतांची बोचरी टीका

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष की विश्वपुरुष आहेत, असे प्रमाणपत्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मुंबईत येऊन दिले, पण या देशाला फक्त एका पुरुष नेतृत्वाची गरज आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड ज्यांना युगपुरुष असे संबोधित आहेत त्यांनी आधी पुरुष व्हावे. पुरुषाने माणूस व्हावे आणि त्या माणसाने डोळे उघडून महान राष्ट्राच्या समस्यांकडे पाहावे. सध्या महापुरुष, धर्मवीर, हिंदुहृदयसम्राट पदव्या स्वत:ला चिकटवून घेण्याचे दुकान उघडले आहे. भाजपच्या राज्यात तेवढेच स्वस्त आहे, अशी बोचरी टीका शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – Election 2023: अमित शहांची भविष्यवाणी खरी ठरली; अजित पवार म्हणाले, निकाल काय येणार हे माहीत होतं

- Advertisement -

गॅस सिलिंडर, केरोसिन, दूध, कांदा, कडधान्य महाग झाले. देवळात घंटा बडवून शेंडय़ांना तूप लावून केदारनाथच्या गुहेत ध्यानस्थ बसल्याचे छायाचित्र प्रसिद्ध करून या समस्या संपणार नाहीत. देशातील 80 कोटी गरीब लोकांना सरकार मोफत रेशन देते. हे आत्मनिर्भर बनविण्याचे धोरण नाही. मोफत, फुकट देणे हे दुर्बळांना अधिक दुर्बळ व गरीब-गुलाम करणे. शेतकऱ्यांच्या मालास भाव नाही. हमीभाव तर नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचे वचन होते, ते वचन पूर्ण करण्याची जबाबदारी अयोध्येतील श्रीरामावर टाकता येणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरातून केली आहे.

उत्तर प्रदेशात राममंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याचे भव्य राजकारण केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण होत आहे हे चांगले आहे, पण सध्या विविध सरकारी विभागांत सवा कोटी पदे रिक्त आहेत, ती कधी भरणार? या नोकऱ्या देण्याचे काम मंदिरातून होणार नाही. ते सरकारलाच करावे लागेल, असेही त्यांनी सुनावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – MP Election : Nitish Kumar यांच्या उमेदवारांना शंभरच्या खाली मतदान; मतदारांनी JDU ला सपशेल नाकारलं

उत्तराखंडमधील एका बोगद्यात 41 मजूर 18 दिवसांपासून अडकून पडले होते. तेथे त्यांच्या सुटकेसाठी मनुष्यच प्रयत्न करीत होता. कोणताही महापुरुष देवाच्या दारात ध्यानमग्न बसला म्हणून 41 मजुरांचे प्राण वाचले नाहीत. यंत्र, विज्ञान आणि मनुष्याला शक्ती लावून बोगद्यातले दगड फोडून रस्ता करावा लागला. मोदी हे मंदिरात गेले आणि भस्म, चंदन लावून बसले ते तेलंगणातील हिंदूंची मते मिळावीत म्हणून. त्यांच्या ध्यानमुद्रेस घाबरून लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य माघार घेणार नाहीत, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Post Results Effect : मतमोजणी सुरू असतानाच भाजपा अन् काँग्रेसकडून ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -