Homeक्राइमKolkata Doctor Case : आरजी कर बलात्कार प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप, कोलकात्याच्या...

Kolkata Doctor Case : आरजी कर बलात्कार प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप, कोलकात्याच्या ‘निर्भया’ला न्याय

Subscribe

RG Kar Murder : कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉय याला न्यायालयाने जन्मठेप ठोठावली आहे. सियालदह विशेष न्यायालयाने शनिवारी हा त्याला दोषी ठरवले होते. (sanjay roy sentenced to life imprisonment in RG Kar rape case kolkata’s ‘nirbhaya’ gets justice)

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी हे प्रकरण सुनावणीस घेतल्यानंतर 59 दिवसांनी निर्णय सुनावला आहे. यावेळी दास यांनी संजय रॉयला दोषी ठरविताना सांगितले की, तुला शिक्षा मिळायलाच हवी. या प्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी सुरू झाली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घटनेचा तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते.

जन्मठेपेची शिक्षा ठोठावतानाच न्यायालयाने संजय रॉय याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले की, ही काही दुर्मिळ घटना नाही. त्यामुळे आम्ही दोषीला जन्मठेपेची शिक्षा देत आहेत.

हेही वाचा – Akshay Shinde Fake Encounter : सरकारच्या फेक नरेटिव्हची न्यायालयाकडून पोलखोल, वडेट्टीवारांची टीका

भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला आहे. या कलमांतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना 17 लाखांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, पीडितेच्या पालकांनी भरपाई घेण्यास नकार दिला.

पीडितेच्या पालकांची फाशीची मागणी

या प्रकरणातील पीडितेच्या पालकांच्या वकिलांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. संजय रॉय हा सिव्हिक व्हॉलंटियर असल्याने हॉस्पिटलच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्याकडे होती. पण त्याने सुरक्षा करण्याऐवजी पीडितेसोबत अक्षम्य गुन्हा केला आहे, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त (फाशी) शिक्षा झाली पाहिजे, असा युक्तिवाद वकिलांनी केला.

सुमारे 162 दिवसांनी निर्णय

8-9 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेच्या सुमारे 162 दिवसांनंतर न्यायालयाने शनिवारी आपला निर्णय दिला आणि संजय रॉय यांना दोषी ठरवले. या प्रकरणाची सुनावणी सुमारे 57 दिवस चालली. यापूर्वी या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलीस करत होते. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयने 13 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. त्यांनी 120 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुमारे दोन महिने या प्रकरणी कॅमेरा ट्रायल सुरू होती.

त्याला फाशी द्या; आरोपीच्या आईची प्रतिक्रिया

संबंधित प्रकरणातील आरोपी संजय रॉयला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया रविवारी आरोपीच्या आईने दिली होती. मुलाला फाशीची शिक्षा झाली, तरी माझा त्याला आक्षेप नसेल. कारण त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. एक महिला आणि तीन मुलींची आई असल्याने मी त्या पीडितेच्या मातेचे दु:ख समजू शकते, असेही त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा – Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात उसळी, चांदीलाही भाव