घरट्रेंडिंगसंत रविदास जयंतीविशेष; 'ब्राह्मण मत पूजिए, जो होवे गुणहीन'

संत रविदास जयंतीविशेष; ‘ब्राह्मण मत पूजिए, जो होवे गुणहीन’

Subscribe

महाराष्ट्र ही संताची भूमी मानली जाते. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अनेक संत होऊन गेले, त्याप्रमाणे उत्तर भारतातही अनेक संत झाले. संत कबीर आणि संत रविदास है त्यापैकीच. १५ व्या शतकात होऊन गेलेल्या संत रविदास यांची आज जयंती आहे.
संत रविदास यांचा जन्म १४५० च्या दरम्यान रविवारी माघ पोर्णिमेला झाला होता. त्यामुळे प्रत्येक वर्षी माघ पोर्णिमेला त्यांचा जन्मदिन साजरा करण्याची परंपरा रुढ झाली. चर्मकार समाजात जन्मलेले संत रविदास हे देशभरात प्रसिद्ध आहेत. राजस्थानमधील चित्तोड संस्थानातील राजकुमारी मीरा ही त्यांची अनुयायी होती. त्यांनाच आपण संत मीरा म्हणूनही ओळखतो.

संत रविदास यांना भारतात विविध नावांनी ओळखले जाते. उत्तरेत त्यांना संत रैदास तर महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा अपभ्रंष होऊन संत रोहिदास असे म्हटले जाते. दुर्दैव म्हणा किंवा इतिहासाची चाड पण महाराष्ट्रात संत रविदास जास्त लोकांना परिचित नाहीत. चर्मकार समाजात देखील अशिक्षण आणि प्रबोधनाचा वारसा नसल्यामुळे फक्त चप्पल शिवणारे लोक संत रोहिदास यांचा फोटो आपल्या दुकानात लावतात. तोही चामड्याचे काम करतानाचा.. पण इतिहास काही वेगळेच सागंतो. संत रविदास हे चापड्याची दुरुस्ती करत नव्हते तर ते व्यावसायिक होते. आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम हाती घेतले होते. त्यासाठी उत्तर भारतातील बोली भाषा त्यांनी निवडली होती. रविदासांच्या दोह्यात मनपरिवर्तन करण्याची शक्ती होती.

- Advertisement -

संत रविदास यांचे क्रांतिकारी दोहे 

मध्ययुगीन भारतात सर्व समाजावर रुढी-कर्मकांडाचा प्रभाव होता. अशातच त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी संत रविदासांनी समतेचा विचार दिला.

ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन |
पूजिए चरण चंडाल के जो होने गुण प्रवीन ||

- Advertisement -

या दोह्यातून संत रविदास सांगतात की जन्माने ब्राह्मण असला आणि त्याच्यात चांगले गुण नसतील तर त्याची पुजा करण्याचे काही कारण नाही. त्यापेक्षा जो खालच्या जातीतील असूनही जर गुणवान असेल तर त्याचे अनुयायी बना.

कोई भी व्यक्ती छोटा या बडा
अपने जन्म के कारण
नही बल्कि अपने कर्म के
कारण होता है|
व्यक्ती के कर्म है
उसे ऊंचा या नीचा बनाते है|

ऐसा चाहू राज मैं, जहाँ मिले सबन को अन्न |
छोट बड़ो सब सम बसै, रैदास रहे प्रसन्न ||

संत रविदास अशा समाजाचीन रचना करु पाहतात, जिथे कुणीही मोठा किंवा छोटा नसेल. सर्व लोक विषमता विसरुन एकत्र नांदतील. तेव्हा माझ्या मनाला प्रसन्नता लाभेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -