घरदेश-विदेशसांताक्लॉजचे मास्क घालून घातला दरोडा

सांताक्लॉजचे मास्क घालून घातला दरोडा

Subscribe

गुरुग्राममध्ये पोलीस ठाण्याहून जवळ असलेल्या दुकानांवर चोारंच्या टोळीने दरोडा टाकला आहे. १४ दुकांनावर हा दरोडा टाकण्यात आला आहे. सीसीटीवीच्या आधारावर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गुरुग्राम येथे दहा चोरांच्या टोळीने दुकाने फोडण्याची घटना घडली आहे. चोरी करण्यासाठी या टोळीने सांताक्लॉजचे मास्क वापरले असल्याचे समजले आहे. सीसीटीवीमध्ये ओळख पटू नये म्हणून चोरांनी हे मास्क घातले होते. एका रात्रीतूनच ही दुकाने फोडण्यात आली. शुक्रवारी उशीरा रात्री ही घटना घडली. १० चोरांनी एकाच परिसरातील १४ दुकांने फोडली. या घटनास्थळावरून पोलीस ठाणे जवळ असून देखील चोरांनी दरोडा टाकला आहे. या दुकानातील रोख, सामान आणि विविध महाग वस्तू चोरांनी लंपास केले आहेत. हे एका नही तर दोन टोळींचे काम असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. येथील दुकानदार जेव्हा सकाळी दुकान उघडण्यासाठी आले त्यावेळी त्यांना दुकान फोडले असल्याचे समजले. त्यांनी तत्काळ पोलिसांना या बाबत सुचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीस सुरुवात केली आहे.

सीसीटीवी फुटेजमधून शोध सुरु

यामधील काही दुकानदारांनी आपल्या दुकानात सीसीटीवी बसवले होते. या सीसीटीवीत तपसल्यानंतर या चोरांनी सांताक्लॉजचे मास्क घालून चोरी केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे की, “सीसीटीवीच्या आधारावर तपास सुरु आहे. खांसा मार्केट रोड येथील सीसीटीवीत दोन चोर सांताक्लॉजचा मास्क घातलेले आढळून आले आहेत. मास्क घातले असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. मात्र हे चोर सराईत असून ते रेकॉर्ड वरचे आहे. लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -