Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश चोरांचे सरदार दिल्लीत सरकार चालवत आहेत..., ठाकरे गटाचे भाजपावर जोरदार टीकास्त्र

चोरांचे सरदार दिल्लीत सरकार चालवत आहेत…, ठाकरे गटाचे भाजपावर जोरदार टीकास्त्र

Subscribe

मुंबई : मोदी सरकारला पाकिस्तानातून दाऊदला आणता आलेले नाही आणि ‘भगोडा’ गुन्हेगार तसेच ज्याच्याबाबत ‘लूक आऊट’ नोटीस जारी झाली आहे तो ललित मोदी समोर दिसत आहे, तोही केंद्र सरकारचे वकील हरीश साळवे यांच्याबरोबर ‘चिअर्स’ करताना. लोकांना मूर्ख बनविण्याचा हा धंदा आहे. सगळे चोर एक आहेत आणि चोरांचे सरदार दिल्लीत सरकार चालवीत आहेत, असे जोरदार टीकास्त्र ठाकरे गटाने भाजपावर सोडले आहे.

हेही वाचा – ‘भारत’ या शब्दाचा 2100 वर्षांपूर्वीचा पुरावा सापडला; ‘हाथीगुंफा’सह ‘विष्णूपुराणा’तही उल्लेख

- Advertisement -

प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या विवाहाची ‘हॅटट्रिक’ केली. त्यांनी तिसरा विवाह केला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला, पण साळवे यांनी त्यांच्या तिसऱ्या लग्नाच्या प्रीत्यर्थ जी मेजवानी दिली त्यात साळवे यांच्या सोबतीने हिंदुस्थानला हवा असलेला भगोडा ललित मोदी ‘चिअर्स’ करताना दिसत आहे. यावर आता मोदी-शहांचे काय म्हणणे आहे? की तेही दिल्लीत बसून साळवे-ललित मोदी जोडीस ‘चिअर्स’ करणार आहेत, असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आला आहे.

मनी लॉण्डरिंगच्या प्रकरणात ललित मोदी भगोडा

ललित मोदी याने नीरव मोदी, विजय मल्ल्या, मोईन कुरेशी, मेहुल चोक्सी, नितीन संदेसरा यांच्याप्रमाणे देशातून पलायन केले आहे. ललित मोदी, मोईन कुरेशी हे हिंदुस्थानातील आर्थिक गुह्यांचा तपास करणाऱ्या सर्वच तपास यंत्रणांना हवे आहेत व त्यात ‘ईडी’सुद्धा आहे. साधारण 4500 कोटींच्या आर्थिक हेराफेरी प्रकरणात ललित मोदी गुन्हेगार आहे. प्रकरण अर्थात मनी लॉण्डरिंगचे आहे. त्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे आणि तो आज ‘भगोडा’ आहे, असे सामनातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याण दहीहंडी उत्सव: परवानगीवरून ठाकरे-शिंदे गट आमने-सामने, मुंबई उच्च न्यायालय पडले मधे

भाजपाची पुरती नाचक्की

ललित मोदीस कुणाचे संरक्षण लाभले आहे, हे साळवेंच्या तिसऱ्या लग्नाने उघड केले. तिसऱ्या लग्नाची ही गोष्ट रंजक आहे. देशाचा व्हिलन त्या लग्नात दिसल्यामुळे भाजपाची पुरती नाचक्की झाली, पण निर्लज्जम् सदासुखी! भाजपचा मुखवटा हा असा रोजच गळून पडतो आहे, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisment -