मुंबई : आजवर आपण अनेक प्रकारच्या कॅन्सरची माहिती वाचली आहे. कॅन्सर कसा होतो? त्याच्यावर उपचार काय? याबद्दलची माहिती अनेकांना माहीत आहे. पण आता साडी नेसल्यामुळे कॅन्सर होतो, अशी नवी माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारतात अनेक महिला साडी नेसतात. भारतातील हे साडी प्रेम आता परदेशातही पोहोचले आहे. पण याच साडीमुळे आता कॅन्सर होऊ लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त साडीच नाहीतर इतर कपडेही चुकीच्या पद्धतीने घातल्यास कॅन्सर होऊ शकतो, अशी माहिती देखील डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. (Saree cancer patients in India)
हेही वाचा… Pune News Today : उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू; ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
भारतात महिला सर्वात जास्त साडी नेसतात. साडीमुळे होणाऱ्या या कॅन्सरला वैद्यकीय भाषेत स्कॅमस सेल कार्सिनोमा म्हणतात. या आजाराचे रूग्ण भारतात सर्वाधिक आहेत. दिल्लीच्या पीएसआरआय हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. विवेक गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या महिलेने एकच कापड खुप वेळ घातला तर तो कंबरेला घर्षण करतो, ज्यामुळे तिथली त्वचा सोलून काळी पडू लागते. साडी घालण्यासाठी महिला सुती पेटीकोट कंबरेवर सुती धाग्याने बांधतात आणि याचमुळे साडी कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
त्याशिवाय, हा कॅन्सर होऊ नये यासाठी कपड्यांची स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे आहे. तसेच, शरीराच्या ज्या भागामध्ये जास्त उष्णता आणि घाम येतो त्या भागाचा कॅन्सर होऊ शकतो. सध्या बिहार आणि झारखंडमधून या आजाराची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे हा आजार होऊ नये, यासाठी अत्यंत टाईट कपडे वापरणे, सोडले पाहिजे. ब्रा, अंडरवेअर सारखे टाईट कपडे वापरणे यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. याशिवाय जिमसाठी घालण्यात येणारे टाइट कपडे देखील समस्या निर्माण करू शकतात. नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे घालावे.
हेही वाचा… गरम पाणी पिणं आरोग्यासाठी घातक
डॉक्टरांनी याबाबतचा अभ्यास केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय महिलांमध्ये आढळलेल्या एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी 1 टक्के प्रकरणे साडी कॅन्सरची आहेत. मुंबईतील कूपर रुग्णालयातही याबाबत संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात साडीसोबतच धोतराचाही समावेश करण्यात आला. या साडीच्या कॅन्सरचे नाव बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले होते. जेव्हा तिथे या प्रकरणाबाबत 68 वर्षीय महिला या आजाराने ग्रस्त होती. ही महिला वयाच्या 13 व्या वर्षापासून साडी नेसत होती.