घरट्रेंडिंगसत्यश्री शर्मिला- देशातील पहिल्या 'तृतीयपंथी' वकील

सत्यश्री शर्मिला- देशातील पहिल्या ‘तृतीयपंथी’ वकील

Subscribe

सत्यश्री शर्मिला या देशातील पहिल्या तृतीयपंथी वकिल बनल्या आहेत. देशभरातून सत्यश्री यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तामिळनाडूच्या रामनाथपुरम इथे राहणाऱ्या सत्यश्री शर्मिला आपल्या देशाच्या पहिल्या तृतीयपंथी वकील बनल्या आहेत. शनिवारी बार काउंसिल ऑफ तामिळनाडू येथे शर्मिला यांच्या नावाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. देशाच्या पहिल्या तृतीयपंथी वकील बनलेल्या शर्मिला यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान याप्रकरणी सत्यश्री या त्यांच्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, ‘मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत केली आहे. आयुष्यामध्ये खूप संघर्ष केल्यानंतर मी याठिकाणी येऊन पोहचले आहे. एक तृतीयपंथी म्हणून हा प्रवास सोपा नव्हता. मी आशा करते की, मी माझ्याप्रमाणेच माझ्या समुदायातील लोक देशातील उच्चपदांवर विराजमान होतील.’ ‘२०१४ साली चेन्नई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथ्यांच्या आयुष्यात चांगला बदल झाला आहे’, असंही शर्मिला यावेळी म्हणाल्या. दरम्यान या पदासाठी निवड झालेल्या एकूण ४८५ उमेद्वारांपैकी शर्मिला या एकच तृतीयपंथी उमेद्वार होत्या.

शर्मिलाची जीवगाथा थोडक्यात…

तामिळनाडूच्या असलेल्या शर्मिला यांनी बी.कॉमचं पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘लॉ’चं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. २००४ ते २००७ या तीन वर्षांत त्यांनी आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये शिकत असतानाच शर्मिला यांना त्या तृतीयपंथी असल्याचा उलगडा झाला. त्यानंतर शर्मिला यांनी तब्बल ११ वर्ष तृतीयपंथांसाठी काम केले. एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून शर्मिला यांनी तृतीयपंथ्यांच्या अनेक समस्यांवर काम केले. शर्मिला सांगतात की, ‘वकिल बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आव्हानात्मक होता. तृतीयपंथी असल्यांचं समजल्यावर एक माणूस म्हणून माझ्यात अनेक बदल झाल्याचं’ त्या सांगतात. माझी मेहनत, चिकाटी यांच्या जोडीला मला लोकांची लाभलेली उत्तम साथ यामुळे मी आज या पदावर पोहचल्याचं शर्मिला सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -