मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले सत्येंद्र जैन यांची तब्येत खालावली

न्यायालयाने सत्येंद्र जैन यांनी १३ जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या अटकेपासून संरक्षण न मिळाल्याने सत्येंद्र जैन यांनी राऊज एवेन्यू कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे.

मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीतील नेते सत्येंद्र जैन यांची तब्येत अचानक बिघडली आहे. सुनावणीनंतर कोर्टातून बाहेर पडतानाच सत्येंद्र जैन यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे ईडीने त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल केलं. न्यायालयाने सत्येंद्र जैन यांनी १३ जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या अटकेपासून संरक्षण न मिळाल्याने सत्येंद्र जैन यांनी राऊज एवेन्यू कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. (SATYENDRA JAIN HEALTH DETERIORATED OUTSIDE THE COURT ROOM IN MONEY LAUNDERING CASE)

सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ३० मे रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर, ३१ मे रोजी त्यांना ट्रायल कोर्टात सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडीच्या ताब्यात देण्यात आले होते. आज त्यांची मुदत संपल्याने त्यांना एवेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. ईडीने पुढील चौकशीसाठी सत्येंद्र जैन यांची पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र, त्यांच्या या मागणीला सत्येंद्र जैन यांचे वकिल कपिल सिब्ल यांनी विरोध केला. दरम्यान, कोर्टाने १३ जूनपर्यंत सत्येंद्र जैन यांना ईडी कोठडी सुनावली आहे.

सुनावणीदरम्यान ईडीने सांगितलं की, “आम्हाला सत्येंद्र जैन आणि वैभव जैन या दोघांची आमने-सामने चौकशी करायची आहे, मात्र सत्येंद्र जैन यांनी तब्येतीचं कारण देऊन ही चौकशी टाळली. याचाच अर्थ असा की, सत्येंद्र जैन चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सीबीआयकडून काही गोष्टी राहून गेल्या असतील तर याचा अर्थ असा नाही की ईडीनेही आपले डोळे बंद करावेत.”

दरम्यान, या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीला चौकशी करण्याचा काहीही अधिकार नाही, असं सत्येंद्र जैन यांचे वकिल कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. यावर ईडीने उत्तर देत म्हटलं की, हे प्रकरण मनी लाँड्रिंग असून याची चौकशी सुरू आहे. फसवणुकीचे हे प्रकरण असून या प्रकरणी दस्तावेज आणि पुरावे आहेत. ज्यानुसार आम्ही चौकशी करत आहोत, असंही ईडीने म्हटलं आहे.