घरदेश-विदेशकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सौदी अरेबियाने भारताला टाकलं 'रेड लिस्ट' मध्ये

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सौदी अरेबियाने भारताला टाकलं ‘रेड लिस्ट’ मध्ये

Subscribe

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशाकडून महत्वाची पावलं उचलली जात आहेत. यासाठी सौदी अरेबियाकडून काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे.

2020 पासून जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अद्याप कोरोना संपुर्णपणे नष्ट झाला नाहीये. देशभरात सध्या लसीकरण मोहीम राबवली जात असून रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. यामुळे कोरोना बाधीतांच्या रुग्णसंख्येत घट होतांना दिसत आहे. अशातच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशाकडून महत्वाची पावलं उचलली जात आहेत. यासाठी सौदी अरेबियाने काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. रेड लिस्टमध्ये टाकण्यात येणाऱ्या देशामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केलं आहे. इतकचं नाही तर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर तीन वर्षासाठी प्रवासाठी बंदी घालण्यात येणार आहे.

सौदी अरेबियाने भारताला टाकलं रेड लिस्टमध्ये

परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, सरकारने मे महिन्यात काही सौदी नारिकांना पहिल्यांदा मार्च 2020 नंतर कोणत्याही पुर्व परवानगीशिवाय परदेश प्रवासास परवानगी दिली होती. तसेच ज्या नागरिकांनी या नियमांच उल्लंघन केलं असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच नागरिकांना तीन वर्षासाठी प्रवासबंदी, दंड आकारण्यात येणार आहे.  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबियाने ज्या देशामध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे त्यामध्ये भारताचाही समावेश करण्यात आला असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे.

- Advertisement -
आणखी कोणते देश आहेत रेड लिस्टमध्ये

सौदी अरेबियाने अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त, इथोपिया, भारत, इंडोनेशिया, लेबॅनन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या सर्व देशांचे नाव कोरोनाच्या पार्शभूमीवर रेड लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे.तसेच नारिकांना या देशामध्ये प्रवास करण्यास सक्त मानाई करण्यात आली आहे.

 

- Advertisement -

हे हि वाचा – World Nature Conservation Day: जागतिक निसर्ग संवर्धन दिन का साजरा केला जातो? काय त्यामागचा इतिहास जाणून घ्या

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -