घरदेश-विदेशन्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीपेक्षा मोठी इमारत उभारणार, सौदी अरेबियाचा निर्धार

न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीपेक्षा मोठी इमारत उभारणार, सौदी अरेबियाचा निर्धार

Subscribe

सौदी अरेबिया लवकरच एका ड्रीम प्रोजेक्टला सुरुवात करणार आहे. या ड्रीम प्रोजेक्टची सौदीचे राजकुमार आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. भविष्याची इमारत असे याचे वर्णन केले जात आहे.

सौदी अरेबिया लवकरच एका ड्रीम प्रोजेक्टला सुरुवात करणार आहे. या ड्रीम प्रोजेक्टची सौदीचे राजकुमार आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. भविष्याची इमारत असे याचे वर्णन केले जात आहे. हा प्रकल्प अतिशय खास आणि सुंदर असणार आहे. या प्रकल्पाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाखविण्यात येणारी इमारत अतिशय सुंदर आहे. अरब न्यूजच्या वृत्तानुसार ही इमारत भविष्याचा वेध घेऊन बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पात तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ Reddit वर Damnthatsinteresting नावाच्या युजर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. मुकाब असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पात सूर्य आणि वाऱ्यातून बाहेर पडणारी ऊर्जा विजेसाठी वापरली जाईल. तर यासाठी स्वतंत्र वीज प्रकल्प उभारले जाणार नाहीत, अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

ही इमारत क्यूबच्या आकारात असेल, जी न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा 20 पट मोठी असेल. या इमारतीत म्युझियम आणि चित्रपटगृह देखील असेल. तसेच या इमारतीत 80 ठिकाण असे असतील जिथे मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या इमारतीत 104,000 फ्लॅट्स, 9,000 हॉटेल रूम आणि ऑफिस स्पेस असेल. या सगळ्याशिवाय अनेक कम्युनिटी सेंटर्स देखील या इमारतीत असतील.

- Advertisement -

हा प्रकल्प अतिशय खास आहे. यामध्ये हिरवळीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. लोकांच्या आरोग्याचा विचार करून ही इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच लोकांना चालण्यासाठी आणि सायकलिंग करण्यासाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही इमारत 400 मीटर उंच, 400 मीटर लांब आणि 400 मीटर रुंद असेल. ती क्यूबच्या आकारात असेल. भविष्याचा विचार करून ही इमारत बांधण्यात येणार आहे. आधुनिकतेच्या दृष्टीने योग्य त्या सर्व सुविधा या इमारतीत असतील.

सौदीचे राजकुमार आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांना या मेगा प्रोजेक्टद्वारे राजधानी रियाधचा आकार आणि येथे राहणारी लोकसंख्या 2030 पर्यंत दुप्पट करण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी देशाची तिजोरी खुली केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोहम्मद बिन सलमान रियाधच्या डाउनटाउन परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पासाठी ते सुमारे 800 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

हेही वाचा – ‘ईपीएफओ’मध्ये ई-नॉमिनेशन हिताचे

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळापासून 20 मिनिटांचे अंतर असेल. पाहिलं तर हे खूप सुंदर ठिकाण आहे. हा प्रकल्प 2017 मध्ये सांगितला होता. अपेक्षेनुसार हा प्रकल्प 2030 मध्ये तयार होईल. हे शहर भारतासाठी खूप खास असणार आहे. या मेगा सिटी प्रकल्पातून 3.34 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. सध्या या देशात २५ लाख भारतीय राहतात. या देशात बहुसंख्य कुशल लोक जास्त आहेत, जे असे प्रकल्प बनवण्यात निष्णात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -