कोरोनानंतर सौदी अरेबियात भारत, पाकिस्तानसह ‘या’ सहा देशांतील प्रवाशांना मिळणार प्रवेश

saudi arabia to lift entry restrictions from six countries including india and pakistan
कोरोनानंतर सौदी अरेबियात भारत, पाकिस्तानसह 'या' सहा देशांतील प्रवाशांना मिळणार प्रवेश

जगभरात कोरोना संसर्गाची दाहकता कमी होत असल्याने अनेक देश आता विमान प्रवासावरील निर्बंध शिथील करत आहेत. अशातच सौदी अरेबिया देशाने भारत, पाकिस्तानसह सहा देशांमधील नागरिकांसाठी प्रवासावर असलेले निर्बंध हटवले आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने हे निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोरोनाविरोधी लसींचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना आत्ता सौदी अरेबियामध्ये थेट प्रवेश दिला जाणार आहे. तसेच या सहा देशांतून येणाऱ्या लसवंत प्रवाशांना सौदीमध्ये येताच १४ दिवस क्वारंटाइन राहण्याची गरज भासणार नाही.

सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सौदी अरेबियामध्ये सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी असेलेले प्रवासाचे नियम १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होतील. यात भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, ब्राझील, व्हिएतानाम आणि मिस्त्र देशाचा समावेश आहे. मात्र या लोकांची कोरोना टेस्ट करत त्यांना सरकारी खर्चावर पाच दिवसं सौदी अरेबियामध्ये क्वारंटाईन रहावे लागेल.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये सौदीसह अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध कडक करण्यात आले होते. यात लेबनान, संयुक्त अरब अमिरात, मिस्त्र, तुर्की, अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, फ्रान्स, इटली, आयलॅंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, स्वीडन, ब्राझील, अर्जेंटीना, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, भारत, इंडोनेशिया आणि जपान या देशांचा समावेश आहे. मात्र जे सौदीमध्ये येण्याआधी इतर कोणत्याही देशांतून १४ ते २० दिवस प्रवास करुन येत असतील त्यांच्यावर हे नियम अद्याप लागू असेल.