घर देश-विदेश सौदी राजकुमाराच्या वक्तव्याने पाकिस्तानचे टेंशन वाढले; भारताविरोधी भूमिका बदलणार?

सौदी राजकुमाराच्या वक्तव्याने पाकिस्तानचे टेंशन वाढले; भारताविरोधी भूमिका बदलणार?

Subscribe

नवी दिल्ली : सौदी अरेबियाचे राजकुमार (Prince of Saudi Arabia) मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांनी नवी दिल्लीत आयोजित जी-20 शिखर परिषदेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी भारताकडून मिळालेल्या आदरातिथ्याल प्रत्यत्तर म्हणून असे वक्तव्य केले ज्याने पाकिस्तानचे टेंशन वाढले आहे. मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानचे नाव न घेता वक्तव्य केले की, देशांना त्यांच्या देशात दहशतवादाला आश्रय देणे बंद करावे लागेल. त्यांना अशा सर्व संघटना संपवाव्या लागतील. याशिवाय दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी लागेल. मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून या वक्तव्याची पाकिस्तानने कधीच अपेक्षा केली नसेल. (Saudi Princes Statement Raises Pakistans Tensions Will the anti India role change)

पाकिस्तानवर गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप भारताने केला आहे. मात्र हे सर्व आरोप पाकिस्तानने नेहमीच फेटाळले आहेत. ओसामा बिन लादेनला अमेरिकी सैन्याने पाकिस्तानमध्ये जाऊन मारले. याशिवाय मुंबई हल्ल्यातील दोषींपर्यंत सगळ्यांनाच पाकिस्तानात आश्रय दिल्याचा आरोप आहे. याशिवाय सौदी अरेबियाच्या पाकिस्तानने अनेक दशके जिहादची फॅक्टरी चालवली आहे. पण आता तेथील राजकुमारनेच दहशतवादावर वक्तव्य केल्यानंतर पाकिस्तानसमोर दुसरा पर्याय उरला नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे इस्रायलसारखा देश अरब देशांना सोबत घेऊन युरोपमधून अरबस्तानमार्गे भारतापर्यंत कॉरिडॉर बांधणार आहे. त्यामुळे पाकिस्तान यापुढे कोणत्या तोंडाने जगात इस्लाम धोक्यात असल्याचा नारा देणार? अशा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांची जीभ खेचू; केंद्रीय मंत्र्यांनी दिली थेट धमकी

सौदीच्या निधीतून पाकिस्तानने उभारला जिहाद कारखाना 

शिया देश इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर सौदी अरेबियाने सुन्नीबहुल पाकिस्तानमध्ये आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली. यासाठी 80 च्या दशकात पाकिस्तानमधील मदरशांना आणि मौलवींना मोठ्या प्रमाणावर सौदी अरेबियाने निधी देण्यास सुरुवात केली. परंतु पाकिस्तान भारताकडून 1971 मध्ये मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सौदी अरेबियाकडून मिळत असलेल्या निधीचा जिहाद कारखाना उघडण्यासाठी वापर केला. त्याकाळात एकीकडे सौदी अरेबियासारखे देश पेट्रो डॉलरच्या माध्यमातून मुस्लिम समाजावर आपली पकड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होे, मात्र दुसरीकडे दुसरीकडे पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कर आपल्या देशात तरुणांना दहशतवादी बनवण्यात व्यस्त होते.

सौदी अरेबियाला पुरोगामी भारताचे भागीदार व्हायचे

- Advertisement -

सौदी अरेबियाकडून मिळालेल्या पैशाचा पाकिस्तानने दहशतवादासाठी वापर केल्यामुळे त्यांच्या देशाचा विनाश होताना जग पाहत आहे. दहशतवादाच्या बाबतीत जगाची डोकेदुखी ठरलेल्या या देशावर आता सौदी अरेबियानेही निशाणा साधला आहे. पाकिस्तान देश आता केवळ कटोरा घेऊन उभा आहे, त्यांची परिस्थितीवर मात करण्याची मानसिकता नाही, असे सौदीचे राज्यकर्तेही मानू लागले आहेत. त्यामुळे सौदीचे पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी भारतात येऊन पाकिस्तानला इशारा देणे अत्यंत महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे सौदी अरेबियाला आता कट्टरतावादी पाकिस्तानपेक्षा पुरोगामी भारताचा भागीदार व्हायचे आहे, हेही आता स्पष्ट होत आहे.

हेही वाचा – Afghanistan : पाकिस्तानमध्ये अफगाण शरणार्थींसोबत होतंय गैरवर्तन; 100 जणांना बेकायदेशीररित्या घेतलं ताब्यात

पाकिस्तानपासून अमेरिका आणि अरब देश अंतर राखून

दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. जेव्हा अफगाणिस्तानात रशियन सैन्याशी लढण्यासाठी पाकिस्तानने लढवय्ये तयार करण्यासाठी अमेरिकेकडून मोठी रक्कम घेतली होती. तसेच शिया देशांतील सुन्नींना शस्त्र उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली मध्य आशियातूनही भरपूर पैसा गोळा करणारा पाकिस्तान आता सर्व बाजूंनी घेरला गेला आहे. ओसामा बिन लादेनला आश्रय दिल्याने अमेरिका आणि युरोपीय देशांनी पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. जगात शांततेची चर्चा सुरू असताना अमेरिका आणि अरब देश पाकिस्तानपासून अंतर राखताना दिसत आहेत. त्यामुळे आता सौदीची सर्वाधिक गरज असताना हा देशही अंतर राखताना दिसत असल्यामुळे पाकिस्तानला काळजी वाटणे स्वाभाविक आहे.

पाकिस्तान भारतविरोधी आपली भूमिका बदलेल?

नवी दिल्लीत आयोजित जी-20 मुळे पाकिस्तान देश पूर्णपणे एकाकी पडताना दिसत आहे. याशिवाय सौदी राजकुमाराच्या उदासिनतेमुळे तिथले लोकही दुखावले गेले आहेत. 2019 मध्ये राजकुमार जेव्हा भारतात आला तेव्हा तो काही काळ पाकिस्तानमध्ये राहिला होता. त्यामुळे यावेळी त्याने भारतातून परतताना काही काळ पाकिस्तानात राहावे यासाठी पाकिस्तान सरकार आणि तेथील लष्करांकडून अनेक आठवडे प्रयत्न सुरू होते, मात्र त्यांना यश आले नाही. याशिवाय भारतातून युरोपमार्गे अरबस्तानपर्यंत बांधण्यात येणारा कॉरिडॉर आता प्रत्यक्षात आला आहे. तसेच सौदी अरेबिया भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक अरब देशांशी भारताची घनिष्ठ मैत्री आहे. अशा परिस्थितीत आपला देश एकाकी पडू शकतो, असे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना वाटू लागले आहे. तसेच  भारतासोबत व्यापार सुरू झाल्याने सर्वसामान्यांना वाढलेल्या किमतीपासून दिलासा मिळेल, असे तेथील व्यापारी वर्ग आधीच सांगत आहे. त्यामुळे पाकिस्तान येत्या काळात भारताविरोधी आपली भूमिका बदलेल का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

- Advertisment -