बापूंच्या हत्येसाठी सावरकरांनी गोडसेला मदत केली, तुषार गांधींचा मोठा खुलासा

महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी नथूराम गोडसेला सावरकरांनी मदत केली असल्याचा दावा तुषार गांधी यांनी केला आहे.

Tushar Gandhi
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) निमित्ताने महाराष्ट्रात आलेले असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swantantryaveer Savarkar) यांच्यावरून मुद्दा छेडला. सावरकर यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिवसेनेने राहुल गांधींच्या वक्तव्याला विरोध केलाय तर भाजपाने राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात निषेध केला आहे. असं असताना महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पणतु तुषार गांधी (Great Grand Son Tushar Gandhi) यांनी आणखी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी नथूराम गोडसेला सावरकरांनी मदत केली असल्याचा दावा तुषार गांधी यांनी केला आहे.

हेही वाचा – जय शिवाजी, जय महाराष्ट्र! राहुल गांधींनी महाराष्ट्रातून घेतला निरोप, भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेशात

नथुराम गोडसे यांनी काल रात्री उशिरा याबाबत ट्विट केलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं.”


राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर घेतलेल्या सभेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वक्तव्य केलं. सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, असं राहुल गांधी म्हणाले. तर, सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती याचेही कागदपत्र राहुल गांधींनी माध्यमांसमोर सादर केले. यावरून राज्यात खळबळ माजली होती. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, राहुल गांधींना ज्याप्रमाणे विरोध झाला त्याचप्रमाणे त्यांची बाजू मांडण्याकरता महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधीही मैदानात उतरले.

“जे इतिहासत नमूद आहे, तेच मी सांगितलं. पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंद आहे त्यानुसार २६ आणि २७ जानेवारी १९४८रोजी नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले होते. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला आणि तेथून ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरला त्यांनी सावरकरवादी असणाऱ्या परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडलं,” असं तुषार गांधी यांनी आधी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.