शक्तीशाली राष्ट्रांसमोर मान झुकवणे ही सावरकरांची विचारधारा, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

बलवान, शक्तीशालींसमोर नतमस्तक व्हायचं, ही सावरकरांची विचारधारा आहे. असं सांगत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या चीन संबंधीच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Rahul Gandhi's first reaction after cancellation of MP

बलवान, शक्तीशालींसमोर नतमस्तक व्हायचं, ही सावरकरांची विचारधारा आहे. असं सांगत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या चीन संबंधीच्या वक्तव्याचा समाचार घेतला. चीनची अर्थव्यवस्था ही भारतापेक्षा बलाढ्य आहे, त्यांच्यासोबत आपण कसं लढू शकतो. असं विधान जयशंकर यांनी नुकतचं एका मुलाखतीत केलं आहे. यावरुन राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाजपवर हल्लाबोल केला.

बलवानांपुढे मान झुकवणं ही सावरकरांची विचारधारा – राहुल गांधी 

जयशंकर यांचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, भारत सरकारचे एक मंत्री म्हणतात, चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा शक्तीशाली आहे. त्यांच्यासोबत आपण कसे लढणार? इंग्रजांशी लढताना भारताची अर्थव्यवस्था त्यांच्यापेक्षा मोठी होती का? असा सवाल राहुल गांधींनी केला. शक्तीशालींसमोर नतमस्तक होणं हा भित्रेपणा असल्याची टीका राहुल गांधींनी भाजपवर केली आहे. बलवानांपुढे मान झुकवायची ही सावकरकरांची विचारधारा आहे. जो कमकुवत आहे त्याच्यासोबत तुम्ही लढणार आणि जो बलाढ्य आहे त्यांच्यासमोर नतमस्तक होणार. याला नेभळटपणा म्हणतात. हाच का तुमचा राष्ट्रवाद. आणि हिच का तुमची देशभक्ती, असा सवाल राहुल गांधींनी भाजपला उद्देशून केला.


काय म्हणाले होते एस जयशंकर
एका मुलाखतीत एस जयशंकर यांना चीन भारत संबंधांबद्दल विचारण्यात आले होते. ते म्हणाले, चीन ही मोठी अर्थव्यवस्था आहे आणि भारत ही छोटी अर्थव्यवस्था आहे. आपण त्यांच्यासोबत युद्ध करु शकत नाही.
पराराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेससह विरोधीपक्षाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

उद्धव ठाकरे गप्प का? – देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी यांनी सावरकरांचं नाव घेतल्यावरुन भाजप आक्रमक झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटालाही यावरुन घेरले आहे. काँग्रेस वारंवार सावरकरांचा अपमान करत आहे, असं असतानाही उद्धव ठाकरे गप्प का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून गेली तेव्हा चिखली आणि अकोल्यात राहुल गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख माफीवीर केला होता. तेव्हा भाजप आणि मनसेने त्यांचा विरोध केला होता. तर त्यानंतर काश्मीरमध्ये यात्रा पोहचल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे यात्रेत सहभागी झाले होते.

हेही वाचा : राजकीय निवृत्तीच्या बातम्यांवर सोनिया गांधींनी दिले स्पष्टीकरण, म्हणाल्या…